Share

रोहित पवारांचं ठरलं…इच्छुक म्हणून ‘या’ मतदारसंघासाठी दिली मुलाखत

Published On: 

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. पक्ष निरीक्षक दिलीप वळसे पाटील आणि अंकुश काकडे यांच्या उपस्थितीत झालेल्या मुलाखतीत पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी जामखेड कर्जत मतदारसंघासाठी काल मुलाखत दिली.

अकोलेचे आमदार वैभव पिचड, अहमदनगर शहरचे आमदार संग्राम जगताप आणि श्रीगोंद्यांचे राहुल जगताप हे तीन आमदार या मुलाखतीला हजर राहिले नाहीत, यापैकी वैभव पिचड हे भाजपच्या संपर्कात असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. सातारा इथंही आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असणाऱ्याच्या मुलाखती घेतल्या, यावेळी साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले अनुपस्थित राहिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

तर दुसऱ्या बाजूला आज सोलापुरात देखील आगामी विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती होत आहेत. मात्र राष्ट्रवादीचे दोन जेष्ठ आमदार दिलीप सोपल आणि बबनराव शिंदे हे या मुलाखतींना अनुपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हे दोन्ही नेते सेना आणि भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!