Share

…ती तर केवळ अफवा – शरद पवार

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा :  राष्ट्रवादी पक्ष विलीनीकरणाची बातमी ही केवळ अफवा होती. ज्यांना वाटतं की आपण मित्रांसोबत एकत्र राहू नये, अशा विचारांच्या पत्रकारांना सोबत घेऊन ही बातमी मुद्दाम पसरवली गेली. असे वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. राष्ट्रवादीच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते.

लोकसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवत कॉंग्रेसचा दारूण पराभव केला आहे. लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी ५५ जागा लागतात मात्र कॉंग्रेसकडे केवळ ५२ जागा आहेत. आणि राष्ट्रवादीकडे ५ जागा आहेत, राष्ट्रवादी जर कॉंग्रेसमध्ये विलीन झाल्यास कॉंग्रेस कडे ५७ जागा होतील आणि लोकसभेत विरोधीपक्ष नेतेपद मिळेल.याचदरम्यान गुरुवारी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शरद पवार यांची दिल्लीतील निवासस्थानी जात भेट घेतली होती. दोघांमध्ये तब्बल १ तास बैठक झाली असून पक्ष विलिनीकरणासाठी ही भेट होती असे बोलले जात होते. तशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु आहे.याचदरम्यान, राष्ट्रवादी तर्फे आज मुंबीठ महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकुत पक्षाचे जेष्ठ नेते, खासदार, आमदार उपस्थित होते.

या बैठकीत बोलत असताना शरद पवार यांनी पक्ष विलिनीकरणावर भाष्य केले. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची बातमी साफ खोटी आहे. राष्ट्रवादीचे स्वतंत्र अस्तित्व आहे आणि ते अस्तित्व कायम राहील.ज्यांना वाटतं की आपण मित्रांसोबत एकत्र राहू नये, अशा विचारांच्या पत्रकारांना सोबत घेऊन ही बातमी मुद्दाम पसरवली गेली. असे शरद पवार यांनी म्हंटले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!