Share

‘मुख्यमंत्री घरीच बसून राज्यकारभार चालवत असल्याने राष्ट्रवादीचे नेते दडपशाहीला प्रोत्साहन देत आहेत’

Published On: 

मुंबई : आरोपी असलेल्या वाधवान कुटुंबीयांना महाबळेश्वराला जाण्यासाठी विशेष परवानगी देण्याच्या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टिका करणारा लेख लिहिला म्हणुन आज पुन्हा भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते यांच्या विरोधात नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याच्या प्रकरणी भाजपा प्रवक्ते अवधूत वाघ यांनी महाराष्ट्र भाजपातर्फे तीव्र शब्दात निषेध केला आहे.

‘गोपीचंद पडळकर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’, पडळकरांच्या प्रतिमेला दुधाने अभिषेक

राज्यातील महाआघाडी सरकारने स्वतःचे अपयश लपवण्यासाठी तारतम्य सोडले आहे. सरकारचे अपयश जनतेसमोर आणणाऱयांची मुस्कटदाबी करण्याचे काम महाआघाडी सरकार करते आहे. याच लेखनाबाबत शिवराय कुळकर्णी यांच्या विरोधात लातूर आणि नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी येथेही गुन्हा दाखल करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या दबावात राज्यात पोलिसांचा गैरवापर केला जात असल्याची टीका अवधूत वाघ यांनी केली आहे.

राज्यात ठिकठिकाणी राजकीय विरोधकांवर व पत्रकारांवर गुन्हा दाखल केला जात आहे. राज्यातील अनेक भाजपा कार्यकर्त्यांवर लेखनासंदर्भात गुन्हा दाखल करून त्यांचे तोंड बंद करण्याचा केविलवाणा प्रयत्न महाआघाडी सरकारने चालवला आहे. दोन दिवसांपूर्वी जेव्हा देश आणिबाणीच्या काळ्या कालखंडाच्या आठवणी जागवत होता त्याचवेळी महाआघाडी सरकार ५५ पत्रकारांवर खटले दाखल करण्यात गुंग होते. ही देखील एकप्रकारची अघोषित आणिबाणी असल्याची टीका देखील अवधूत वाघ यांनी केली आहे.

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात औषधाचा घोटाळा सुरू असल्याचा खा. जलील यांचा आरोप

प्रबोधनचे संपादक केशवराव ठाकरे, सामनाचे संपादक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नंतर ऊध्दव ठाकरे अशा ज्यांच्या ३ पिढ्या पत्रकारितेत गेल्या त्या ठाकरे घराण्याचा मुख्यमंत्री असताना टिका करतात म्हणून पत्रकारांवर गुन्हे दाखल होणे भयंकर आहे. मुख्यमंत्री घरीच बसून राज्यकारभार चालवत असल्याने राष्ट्रवादीचे नेते दडपशाहीला प्रोत्साहन देत आहेत. हे विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत वेळेत पोहचतात की नाही, याबद्दलही शंका आहे. कोरोना परिस्थिती तासागणिक चिघळते आहे. हे अपयश झाकण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी चालवली असून सरकारच्या या कृतीचा अवधूत वाघ यांनी निषेध केला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!