Share

‘गोपीचंद पडळकर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’, पडळकरांच्या प्रतिमेला दुधाने अभिषेक

Published On: 

🕒 1 min read

मंगळवेढा : शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे अशी जहरी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बहुजन समाजावर अन्याय केल्याचा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधी सकारात्मक नसून फक्त राजकारण करत आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी महावितरणने उचलले ‘हे’ मोठे पाऊल

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे असं पडळकर म्हणाले आहेत.

पडळकर यांनी केलेल्या या टीकेनंतर वादाला तोंड फुटलं आहे. पडळकर यांच्या या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे.तर मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे मात्र आमदार पडळकर यांच्या समर्थनार्थ ‘गोपीचंद पडळकर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’’ आय सपोर्ट गोपीचंद पडळकर’ अशा प्रकारचे पत्रके हातात घेऊन त्यांच्या प्रतिमेला दुधाने अभिषेक घालण्यात आला.

पाकिस्तानी क्रिकेटरने IPL बद्दल दिली लक्ष्यवेधी प्रतिक्रिया, म्हणाला…

आमदार पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राष्ट्रवादीच्या वतीने त्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. याला प्रत्युत्तर म्हणून मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्‍वर येथील राजे मल्हारराव होळकर चौकात हा अभिषेक घालण्यात आला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!