मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत आणि शिवसेनेमध्ये वादंग सुरु असतानाच माजी नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी मारहाण केल्याची धक्का दायक घटना उघडकीस आली आहे. यावर भाजप आमदार यांनी ट्विट करत ‘साठी उलटलेल्या निवृत्त नौदल अधिकाऱ्याला सहा जण मिळून मारहाण करतात, यांना भामटे नाही तर काय म्हणावं? असा सवाल उपस्थित केला आहे.
साठी उलटलेल्या निवृत्त नौदल अधिकाऱ्याला सहा जण मिळून मारहाण करतात, यांना भामटे नाही तर काय म्हणावं???
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 11, 2020
भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी या घटनेचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी मुख्यमंत्र्यांचे फक्त व्यंगचित्र व्हाट्सअप वरुन फॉरवर्ड केलं म्हणून शिवसेनेच्या दोन शाखाप्रमुख व अन्य कार्यकर्त्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच त्यांना मोठ्या प्रमाणावर जखमा झाल्या आहेत. आता निवृत्त सैनिक अधिकाऱ्यांवर सुद्धा हल्ला करण्याइतकी खालची पातळी शिवसेनेने गाठली आहे. अशा गुंडांना घाबरून राज्यातील व मुंबईतील जनता गप्प बसेल असे मुख्यमंत्र्यांना व शिवसेनेला वाटत असल्यास ते मोठ्या भ्रमात आहेत. सत्तेचा हा माज जनता येणार्याअ काळात उतरवल्या शिवाय राहणार नाही असेही अतुल भातखळकर म्हणाले आहेत.
अभिनेत्री कंगना राणावत के कार्यालय की तोड़फोड़ करके अपनी मर्दानगी दिखाने वाले सत्ताधारी शिवसेना ने अब सत्ता के मद में एक बुजुर्ग भूतपूर्व नौसेना अधिकारी मदन शर्मा को मारपीट करते हुए उनकी आंख को जबरदस्त चोट पहुंचाई है। मुख्यमंत्री घरबैठे तानाशाही चला रहे है। pic.twitter.com/qF2NVcIN55
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 11, 2020
व्हॉटस अप वर मुख्यमंत्री व्यंगचित्र फॉरवर्ड केल्याने माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे.याबाबतची तक्रार खुद्द शर्मा यांनी दिली आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी शिवसेनेवर टीकेचा भडीमार केला आहे.
महत्वाच्या बातम्या
कॉंग्रेसमधून गुलाब नबी ‘आझाद’ तर खरगे यांची महाराष्ट्रातून उचलबांगडी
सत्तेची मस्ती बघा, आयुष्भर कोण सत्तेत राहत नाही. – निलेश राणेंचा हल्लाबोल
‘अति झाल की माती झाल्याशिवाय राहत नाही’ ; भाजप आमदाराची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

