मुंबई : शिवसैनिकांनी एका निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ भाजपच्या वतीने शेअर करण्यात आला असून यावर शिवसेनेवर टीका करण्यात येत आहे.
भाजपचे आमदार राम सातपुते यांनाही यावर टीका केली आहे. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच कार्टून व्हाट्स ऍप्प ला फॉरवर्ड केलं म्हणून नौदलातील माजी सैनिकाला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली.एक लक्षात ठेवा अति झाल की माती झाल्याशिवाय राहत नाही, ‘ अशा शब्दात सातपुते यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच कार्टून व्हाट्स ऍप्प ला फॉरवर्ड केलं म्हणून नौदलातील माजी सैनिकाला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली.एक लक्षात ठेवा अति झाल की माती झाल्याशिवाय राहत नाही. @ShivSena @Dev_Fadnavis @OfficeofUT @BhatkhalkarA pic.twitter.com/Hywn2jRgBK
— Ram Satpute (@RamVSatpute) September 11, 2020
व्हॉटस अप वर मुख्यमंत्री व्यंगचित्र फॉरवर्ड केल्याने माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे.याबाबतची तक्रार खुद्द शर्मा यांनी दिली आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.
महत्वाच्या बातम्या
सत्तेची मस्ती बघा, आयुष्भर कोण सत्तेत राहत नाही. – निलेश राणेंचा हल्लाबोल
महाराष्ट्रात ‘हिटलर राज’ निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला शिवसैनिकांची मारहाण
‘निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या शिवसेनेला जनता माफ करणार नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

