मुंबई : मुंबईत अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकाबद्दल स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआने विनोदातून आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. अखंड भारताचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची थट्टा करताना तिने महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे. त्यामुळे देशातील समस्त शिवप्रेमीमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
अग्रिमा म्हणाली की, शिवाजी या पुतळ्याबाबत अधिक माहिती जाणण्यासाठी मी इंटरनेटच्या सोर्सवर गेली तर त्याठिकाणी सगळं कोरं होतं. कोणीतरी निबंध लिहिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवाजी पुतळ्याचा मास्टरस्ट्रोक आहे जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात सत्ता येईल, दुसऱ्या एकाला वाटलं काहीतरी क्रिएटिव्हिटी कॉंन्सेंट आहे, तो म्हणाला, या जीपीएस ट्रेकरसुद्धा असणार आहे शिवाय त्यांच्या डोळ्यात लेझर लाईट निघेल जी अरबी समुद्रातून येणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांवर नजर ठेवेल. तर तिसरा व्यक्ती येऊन सांगतो, शिवाजी नाही तर शिवाजी महाराज म्हणा, बस्स मी त्यालाच फॉलो केलं” अशा शब्दात अग्रिमाने विनोद केल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
यानंतर संपूर्ण राज्यात एक संतापाची लाट उसळली आहे. मात्र दुसरीकडे मनसेने आपल्या चीर-परिचित ‘खळ खट्याक’ अंदाजात ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा बदनामी करणारा कार्यक्रम झाला त्या ठिकाणी पोहचून पूर्ण थेटर फोडले आहे. मनसे कार्यकर्ते यश रानडे आणि कार्यकर्त्यांनी हा कारनामा केला आहे.
https://www.facebook.com/yash.ranade.3/videos/4050911168315875/
दरम्यान, यावर आता राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी प्रतिक्रिया देत छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी राज्य सरकार कधीच खपवून घेणार नाही, अस म्हंटल आहे. या स्टँडअप कॉमेडियच्या व्हिडीओची तपासणी करण्याचे आदेश मुंबई पोलीस आयुक्तांना देण्यात येतील. या व्हिडीओमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील आणि काही आक्षेपार्ह असेल तर तात्काळ त्यावर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही शंभुराज देसाई यांनी दिली आहे.


