Share

राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला बँक ऑफ महाराष्ट्र दरोडा प्रकरणी अटक

Published On: 

पंढरपूर : बँक ऑफ महाराष्ट्रच्या गाडीवर पडलेल्या 70 लाखांच्या दरोडा प्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि गोणेवाडीचे सरपंच रामेश्वर मासाळ यांना अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे .रामेश्वर मासाळ यांच्यासह दरोडा प्रकरणातील 6 आरोपींना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कालच्या तपासात पोलिसांनी या आरोपींकडून 31 लाखांची रोकड जप्त केली आहे.

अटकेत असलेला रामेश्वर मासाळ हा अजित पवार यांचा कट्टर समर्थक म्हणून जिल्ह्यात ओळखला जात होता.दरम्यान या दरोड्याचा बनाव रचल्याच्या कारणावरुन बँक व्यवस्थापक अमोल भोसले आणि दरोड्यातील आरोपी भाऊसाहेब कोळेकर याना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली असून मासाळ हा या गुन्ह्यातील तिसरा आरोपी बनला आहे.या बँक दरोडा प्रकरणातील सर्व आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आले असून दरोड्यातील उर्वरित रकमेचा शोध आता पोलीस घेत आहेत.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!