Share

आता तराट झालोया, तुझ्या घरात आलोया ; जयंत पाटलांचा विखे पाटलांवर झिंगाटच्या तालावर टोला

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सैराट चित्रपटातील झिंग झिंग झिंगाट गाण्याच्या तालावर, गृहनिर्माण खात्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका केली आहे.

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. विरोधकांकडून सरकारला कोंडीत पकडण्याचे काम सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप, टीका-टिप्पणी सुरु आहे. याचदरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर निशाणा साधला. आता तराट झालोया, तुझ्या घरात आलोया, लै फिरून बांधावरूननी कल्टी मारून आलोया, झालं झिंग झिंग झिंगाट, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

जयंत पाटील यांनी झिंग झिंग झिंगाट या गाण्याच्या तालावरून सत्ताधाऱ्यांवर केलेली टीका

उरात होतिया धडधड
सत्ता जायची वेळ आली
डोक्यात गेलीया हवा
ही युतीची बाधा झाली

झालं… झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंगाट..
झिंग झिंग झिंगाट

चल क्लीनचीट देऊया,
अन पैसे उडवुया.
उडतोया रावसाहेब,
पळतोया गिरीश
इलेक्शन आलया

झालं… झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंगाट..
झिंग झिंग झिंगाट

आता उतावीळ झालोया
नेते फोडाया आलोया
तुझ्या नावाचं कुंकू माझ्या कपाळी लावलया

झालं… झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंगाट..
झिंग झिंग झिंगाट

आयोध्या वरून आलोय
लै दुरून आलोया
शेतकरी आंदोलन करतोया
आम्ही मजा बघातोया
समद्या पक्षात मी लै जोशात
रंगात आलोया

झालं… झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंगाट..
झिंग झिंग झिंगाट

रोजगार गेलया
शेतकरी कंगाल झालया
समद्या राज्याला झालीया
आपल्या युतीची घाई
कधी होणार तू सेना
आमच्या आमदारांची आई

झालं… झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंगाट..
झिंग झिंग झिंगाट

आता तराट झालोया
तुझ्या घरात आलोया
लै लै फिरून बांधावरूननी
कल्टी मारून आलोया

झालं… झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंगाट..
झिंग झिंग झिंगाट

आता इलेक्शन खेळूया
२८८ जागा जिंकूया
कारण मशीन आपलंच हाय रं
काय चिंतेचं कारण नाय रं

झालं… झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंगाट..
झिंग झिंग झिंगाट

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!