Share

NCP | “एकनाथ शिंदे हे भाजपाने वापरलेलं एक हत्यार असून, ते आरएसएसच्या ओंजळीने पाणी पितात”

Published On: 

मुंबई : एकनाथ शिंदे हे भाजपने वापरलेलं एक हत्यार असून, ते आरएसएसच्या ओंजळीने पाणी पितात, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या हेमा पिंपळे यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपला लक्ष्य केलं आहे. पिंपळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या. पुढे त्या असंही म्हणाल्या, भाजपाने एकनाथ शिंदेंच्या तोंडातून ही भाषा वधवली आहे.

एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया –

काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी एका भाषणादरम्यान, सरस्वतीवर एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुठलेही फोटो काढले जाणार नाहीत. कुणाला काहीही वाटेल. त्यांना वाटेल ते आम्ही करणार नाही. जे लोकांना वाटतं तेच आम्ही करणार आहोत, अशी प्रतिक्रिया दिली आहे. यावरून हेमा पिंपळे यांनी शिंदेंवर निशाणा साधला.

हेमा पिंपळे यांनी भाजपवर केला हल्ला-

तसेच,भाजप एकनाथ शिंदेंच्या आडून महाराष्ट्रात, हुकूमशाही आणि मनुस्मृतीचं राज्य आणू पाहत आहे. एकनाथ डोक्यात वाक्य घालून देण्याचं काम भाजपची पिलावळ करत आहेत.

सर्वांनी आपल्या श्रद्धा आपल्याजवळ जोपासल्या पाहिजेत. ज्या सावित्रीबाई फुले यांनी महिलांना घरातून बाहेर काढत स्त्री-शिक्षणाची मुहूर्तवेढ घातली, त्यांना आपण शिक्षणाची देवता मानायचं नाही का? याचं उत्तर भाजपाने दिलं पाहिजे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!