Share

…तरी राष्ट्रवादीला समाधान नाही, निलंबनाच्याचं मागणीवर ठाम

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रपिता महात्मा गांधीयांच्या विषयी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या आयएएस अधिकारी निधी चौधरी यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई केली असून त्यांची बदली मंत्रालयाच्या पाणी पुरवठा विभागात केली आहे. मात्र निधी चौधरी यांच्या बदलीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस समाधानी नसल्याचे दिसत आहे. निधी चौधरी यांची बदली नाही तर त्यांचे निलंबन झाले पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे.

आयएएस अधिकारी निधी चौधरी यांनी, १५० व्या जयंती वर्षाचा अत्यंत जल्लोष सुरु आहे. आता वेळ आली आहे त्यांचा चेहरा चलनी नोटांवरुन हटवण्याची, जगभरातून त्यांचे पुतळे हटवण्याची, त्यांच्या पश्चात रस्ते आणि संस्थांना दिलेली नावं बदलण्याची, तीच आपल्या सर्वांकडून खरी आदरांजली ठरेल. धन्यवाद गोडसे. ३०.०१.१९४८ अशा आशयाचं ट्विट करत गांधीजींचा फोटो शेअर केला होता.

निधी चौधरी यांच्यावर सर्व स्तरावरून टीकांचा भडीमार सुरु होता, इतकेच नव्हे तर, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, चौधरी यांना निलंबित करण्यात यावं अशा मागण्याही करण्यात येत होत्या.याचदरम्यान, निधी चौधरी यांच्या ट्विटची दाखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौधरी यांची मुंबई महापालिकेतून मंत्रालयातील पाणी पुरवठा विभागात बदली करण्यात आली आहे. तसेच, राज्य सरकारकडून निधी चौधरी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. असे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी म्हंटले आहे.

मात्र निधी चौधरी यांच्या बदलीवरून राष्ट्रवादी कॉंग्रेस समाधानी नसल्याचे दुसून येत आहे. चित्रा वाघ यांनी फक्त बदलीने काय होणार?मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निधी चौधरी यांना शासकीय सेवेतून निलंबीत करा. राष्ट्रपुरूषांच्या बाबत असे स्टेटमेंट करण्याची हिंमत होतेचं कशी ? असा सवाल करत ही विकृती राज्यात व देशभरात वाढत चाललीये तिला वेळीचं पायबंद घालण्यासाठी निधी चौधरींचे निलंबन गरजेचे आहे. अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!