टीम महाराष्ट्र देशा – महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकारने आतापर्यंत व्यवस्थित प्रकारे परिस्थिती हाताळली आहे. नेटकऱ्यांकडून मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांचं यासाठी कौतुक देखील होतंय. पण विरोधी पक्ष असलेल्या भाजपला मात्र राज्य शासन कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरतंय, असं वाटतंय.
काल (बुधवारी) रात्रीपासून सोशल मीडियावर #NeedForDevendra नावाचा ट्रेंड होऊ लागला आहे. देवेंद्र फडणवीसांनी कोरोनाची परिस्थिती उद्धव ठाकरेंपेक्षा चांगली हाताळली असती, असं ट्वीटकर्त्यांना या ट्रेंडच्या माध्यमातून सांगायचं आहे.
आता विधान परिषदेचे भाजप आमदार निरंजन डावखरे म्हणतात, ‘ सध्या महाराष्ट्राला शून्य प्रशासनाचा अनुभव असणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची नाही तर आपत्ती व्यवस्थापनात अनुभवी असणाऱ्या प्रशासकाची म्हणजेच देवेंद्र फडणवीसांची गरज आहे.’ तसेच #MaharashtraNeedsDevendra हा टॅगही त्यांनी ट्वीटमध्ये केला आहे.
सध्या महाराष्ट्राला शून्य प्रशासनाचा अनुभव असणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची नाही तर आपत्ती व्यवस्थापनात अनुभवी असणाऱ्या प्रशासकाची म्हणजेच देवेंद्र फडणवीसांची गरज आहे.#MaharashtraNeedsDevendra
— Niranjan Davkhare (@niranjandtweets) March 19, 2020
राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर
आता राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी निरंजन डावखरे यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी डावखरे यांना ट्वीटरवरून उत्तर दिलं आहे.
फडणवीसांचा अभ्यास होऊन वीडीयो कॉन्फ़्रेन्सच्या माध्यमातून माहीती घेईपर्यन्त महाराष्ट्रात गावोगावी तिरड्या उठल्या असत्या. असा घणाघात चव्हाण यांनी केला आहे.
त्यांचा अभ्यास होऊन वीडीयो कॉन्फ़्रेन्सच्या माध्यमातून माहीती घेईपर्यन्त महाराष्ट्रात गावोगावी तिरड्या उठल्या असत्या. https://t.co/BOsRIVRIOo
— Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) (@surajvchavan) March 19, 2020
त्यामुळे राजकीय पक्षांमधील आरोप प्रत्यारोप थांबतील अशी अध्याप तरी चिन्ह नाहीत.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

