Share

हाथरस प्रकरण : मायावतींनी योगी सरकारला दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

Published On: 

लखनौ – हाथरस प्रकरणामुळे सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हाथरस येथील युवतीवर झालेला बलात्कार आणि तिच्या अमानुष हत्येचा निषेध करण्यासाठी काँग्रेसकडून आज सर्व राज्यांमध्ये जिल्हापातळीवर सत्याग्रह करणार आहे.

एका बाजूला योगी सरकारवर टीका होत आहे तर दुसऱ्या बाजूला बसपा प्रमुख मायावती यांनी योगींना एक सल्ला दिला आहे. बसपाच्या नेत्या मायावती यांनी हाथरस प्रकरणात सरकारच्या भूमिकेसंदर्भात ट्विट केलं आहे. हाथरसमध्ये माध्यमांसोबतही गैरवर्तन करण्यात आलं. काल, परवा विरोधी पक्षांचे नेते व लोकांवर पोलिसांकडून झालेला लाठीमार.. हे सगळं अतिशय निषेधार्ह व लज्जास्पद आहे. सरकारला ही अहंकारी व हुकुमशाही वृत्ती बदलण्याचा सल्ला आहे. नाहीतर यामुळे लोकशाहीची मूळच कुमकूवत होतील,” असा सल्ला मायावती यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिला आहे.

दरम्यान, हाथरस येथील दलित महिलेवर झालेला सामूहिक बलात्कार आणि तिच्या मृत्यूचे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने हाताळले, त्याबद्दल त्यांची पदावरून हकालपट्टी करून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केली आहे. हाथरस येथे पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ही मागणी केली आहे.

दरम्यान, हाथसर बलात्कार प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीने केला जाऊ शकतो. तसेच त्या पीडितेच्या कुटूंबाच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे या प्रकरणाचा तपास सुप्रीम कोर्टाने दुसऱ्या राज्याकडे सोपवावा अशी मागणी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या :-

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!