टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची आज बैठक होत आहे. ३० मे रोजी राहुल गांधी यांनी शरद पवार यांच्या दिल्लीतील ६ जनपथ या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस कॉंग्रेसमध्ये विलीन केली जाणार असल्याच्या चर्चांना उधान आले आहे. या बातम्यांचे खंडन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले असले तरी या पार्श्वभूमीवर होणाऱ्या बैठकीकडे देशाचे लक्ष लागले आहे.
दुपारी २ वाजता बैठक होणार असून त्यामध्ये आमदार, खासदार आणि निवडणूक लढलेले नेते व कार्यकारिणीतील लोक उपस्थित असतील. त्यात लोकसभा आणि आगामी विधानसभा याबाबत सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीत तरूण नेतृत्त्वाला संधी दिली पाहिजे अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीत मोठे फेरबदल होण्याची शक्यताही वर्तवली जाते आहे. विधानसभा निवडणुकीत तरूण नेतृत्त्वाला संधी दिली पाहिजे, पक्षातले साचलेपण दूर करण्यासाठी हे पाऊल उचलले जाऊ शकते अशीही शक्यता वर्तवण्यात येते आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

