Share

शरद पवार उद्या सकाळी ११ वाजता फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधणार

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन घोषित करण्यात आलं आहे.  राज्यात आणि विशेषकरून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये कोरोनाची स्थिती चिंताजनक आहे. रोजच्या रोज मुंबईमध्ये कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वेगाने वाढतो आहे. तसेच पालघरच्या घटनेनेही देश हादरून गेला आहे.

तसेच पालघरच्या घटनेवरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणीही विरोधकांनी केली आहे. आता माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्या फेसबुक लाईव्ह वरून जनतेशी संवाद साधणार आहे. याची माहिती त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरून देण्यात आली आहे.

कोवीड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उद्या, मंगळवार, दिनांक २१ एप्रिल २०२० रोजी सकाळी ११ वाजता फेसबुक लाईव्हद्वारे तुमच्याशी संवाद साधणार आहे.

दरम्यान राज्य सरकारने कृषी, अत्यावश्यक सेवा आणि काही ठराविक उद्योगांना लॉक डाऊन मधून सशर्त सूट दिली आहे. याबाबतीतही शरद पवार अधिक माहिती आणि सूचना करण्याची शक्यता आहे. तसेच पालघरच्या घटनेवर पवार काय बोलणार याकडेही सर्वांच लक्ष असेल.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!