टीम महाराष्ट्र देशा : ‘ईडी’ने शरद पवारांविरुद्ध नोंदवलेल्या गुन्ह्याचा निषेध करण्यासाठी बारामतीत बुधवारी 25 सप्टेंबरला बंद पाळण्यात येणार आहे. विविध सामाजिक संघटनांनी या बंदचं आवाहन केलं असून सरकारच्या हुकूमशाहीचा निषेध करण्यासाठी हा बंद असल्याचं या संघटनांनी म्हटलं आहे. सकाळी 10 वाजता बारामतीतल्या शारदा प्रांगणात सगळ्यांना एकत्र जमा होण्याचं आवाहन करण्यात आलंय.
शरद पवार आणि अजित पवार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आल्यामुळे राज्यात राजकीय वातावरण तापलं असून राष्ट्रवादी याचा निवडणुकीत सहानुभूतीसाठी वापर करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. बारामती बंद नंतर आता शरद पवार यांच्यावर सूड बुद्धीने, ईडीचा गैरवापर करत गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केला आहे. तसेच उद्या, बुधवारी या कारवाईचा निषेध म्हणून निदर्शने, रास्तारोको यापैकी जे करता येईल ते करावे, असे आदेशही कार्यकर्त्यांना दिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर नेत्यांवर सूडबुद्धीने आणि सरकारच्या दबावाखाली कारवाई केली जात आहे. हे अतिशय निंदनीय आहे. याचा आम्ही निषेध करत आहोत. सरकारी संस्था या स्वायत्त असून त्या कोणत्याही राजकीय पक्षाला बांधील नाहीत. तरी उद्या याचा निषेध म्हणून कार्यकर्त्यांनी निदर्शने, रस्ता रोको करावेत असे आवाहन करण्यात आले आहे. अशी माहिती अंकुश काकडे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने अजित पवार यांच्यासह इतर ७० जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सुप्रीम कोर्टानेही उच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम ठरवला होता. त्यामुळे आता शरद पवार, अजित पवारांसह महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक प्रकरणातील ७० जणांविरोधात ईडी ने मनी लॉंड्रीगची केस दाखल केली आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांना मोठा दणका बसला असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, राज्य सहकारी को ऑप बँक घोटाळाप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा रद्द करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला होता. तसेच पोलिसांनी योग्य चौकशी करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने अजित पवार यांच्यासह इतर ७० जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४०९,४०६, ४२०, ४६५, ४६७,४६८, ४९१, १२० (ब) यांसोबतच लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य सहकारी बँकेत 25 हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. संचालक मंडळाने नियमांचं उल्लंघन केल्याने बँकेला फटका बसला.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1176519069970792450?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1176516810234974208?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1176516159916535808?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

