Share

चौकशीचा फार्स कशाला, थेट अटक करा;नवाब मलिक यांची मागणी

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- मुंबईतील अंधेरी भागातल्या कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. मात्र चौकशी करण्याची गरज नाही, कायद्यातील तरतुदीनुसार कामगार रुग्णालयाचे डायरेक्टर जनरलच या घटनेला जबाबदार आहेत. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

दरम्यान,मुंबईतील अंधेरी इथल्या इ.एस.आय.सी.च्या कामगार रुग्णालयातल्या आगीच्या दुर्घटनेतील आणखी दोन जखमींचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे या दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा आता 8 झाला आहे. यात जखमी झालेल्या इतर 176 जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!