Share

माझी स्पर्धा मोदींशी, मी आडसुळांचे आशीर्वाद घ्यायला जाणार : नवनीत कौर राणा

Published On: 

 टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाले आहेत. अमरावती लोकसभा मतदार संघात नवनीत कौर राणा यांनी विजय मिळवला आहे. शिवसेनेचे आनंदराव आडसूळ यांचा दारूण पराभव केला आहे.

दरम्यान, नवनीत कौर राणा यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यावेळी, तुम्ही आनंदराव आडसुळांचा पराभव केला याबाबत त्यांना विचारले असता, आनंदराव अडसूळ यांचा जनसंपर्क कमी पडला. त्यामुळे त्यांचा पराभव झाला. खरे तर माझी स्पर्धा त्यांच्याशी नवतीच माझी स्पर्धा ही पंतप्रधान मोदींसोबर होती. असे राणा यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, आनंदराव आडसूळ हे माझ्या आजोबांच्या वयाचे आहेत. आणि मी पुढील कार्यासाठी त्यांचे आशीर्वाद घ्यायला जाणार आहे. असेही त्यांनी म्हंटले.

याचबरोबर, निवडणुकीत तुमचा विजय झाला आहे. आगामी काळात तुम्ही काय कार्य करणार आहात ? असा प्रश्न त्यांना विचारला असता, जिल्ह्यातील समस्या, राज्यातील समस्या दिल्लीत मांडणार आहे. तसेच जिल्हा दारूमुक्त करणार असल्याचे त्यांनी म्हंटले

तसेच, अमरावतीत विमानतळ आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी म्हंटले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!