कोल्हापूर : आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. आदिशक्तींची पूजा देशभरात या काळात केली जाते. महाराष्ट्रात तुळजापूर, कोल्हापूर, वणी आणि माहूर या साडेतीनशक्तिपीठांमध्ये पारंपरिक पद्धतीने हा नवरात्रोत्सव साजरा केला जातो. या काळात महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश व इतर राज्यातील लाखो भाविक देवीचे मनोभावे दर्शन घेत असतात. मात्र या वर्षी कोरोनाच्या सावटामुळे मंदिरे उघडलेली नाहीत. या उत्सव काळात देवींचे सर्व धार्मिक विधी पार पडणार असल्याचेदेवस्थान समितींमार्फत असून भाविकांना देवींचे दरवर्षीप्रमाणे दर्शन घेता येणार नाही. मंदिर व्यवस्थापनांनी भक्तांसाठी ऑनलाइन दर्शनाची सोय करून दिली आहे.
आज सकाळी करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात देखील घटस्थापना करण्यात आली. प्रथेप्रमाणे सुरुवातीला तोफेची सलामी देऊन या उत्सवाला सुरुवात करण्यात आली आहे. दरवर्षी लाखो भक्तांनी फुलणारा मंदिर परिसर मात्र यंदा ओस पडलेला आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने मंदिराच्या चारही दरवाजांजवळ चोख बंदोबस्त ठेवला असून भाविकांनी गर्दी करू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. तर कोल्हापूर शहरात १० हुन अधिक ठिकाणी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आल्यामुळे आपल्या आंबिकेच रूप डोळे भरून बघण्याचं सुख कोल्हापूरकरांना अनुभवता येणार आहे.
अंबाबाईची आज सकाळची पूजा –

मंदिराची आकर्षक रोषणाई –




महत्वाच्या बातम्या-
- मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडून राज्याचा दौरा करावा ही मागणी धरू लागली जोर
- महाराष्ट्रातील ‘या’ दोन शहरांना आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
- ‘लोकांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टी झालेल्या भागाचा प्रत्यक्ष दौरा करावा’
- ‘मराठा समाज बांधवांचा गेल्या 40 वर्षांचा लढा सार्थकी लागेल,न्यायदेवता न्याय करेल हीच आशा’
- सीना नदीच्या पात्रात विजेचा मनोरा कोसळला; महावितरणची १० उपकेंद्रे अंधारात

