Share

मास्क न लावता नवरदेव घोड्यावर ; पोलिसांनी दिला दंडाचा आहेर

Published On: 

नागपूर : गेल्या वर्षी कोरोना रोगाने हाहाकार माजवला होता. देशासह संपूर्ण जगाला कोरोनाने विळखा घातला होता. या रोगावर ठोस उपचार वा लस नसल्याने लाखो नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे हे महत्वाचे असल्याने सार्वजनिक ठिकाणी मास्क सक्ती करण्यात आली होती.

कोरोनाचा वाढता धोका बगता सर्वत्र मास्क घालणे बंधनकारक करण्यात आलं आहे. मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई देखील करत आहे. मात्र एका नवरदेवाने वारतीत मास्क न लावल्याने त्याला दंडाचा आहेर देण्यात आला आहे.

नागपूरमधील नेहरूनगर  येथील लग्न समारंभात एका नवरदेवाची वरात काढण्यात आली होती. नवरदेव घोड्यावर बसलेला होता आणि त्याच्यासोबत वरातीतील काही मंडळी सुद्धा होती. मात्र कोरोनाच्या या संकटात नवरदेवाने चेहऱ्यावर मास्क लावलाच नव्हता. यामुळेच नागपूर मनपाच्या अधिकाऱ्यांनी या नवरदेवाला दंड ठोठावला आहे. वरातीत सहभागी झालेल्या मंडळींवर देखील मास्क न लावल्यामुळे दंडात्मक कारवाई करुन दंड वसूल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!