Share

राजकारण करू नका, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला जागा देण्याचा निर्णय शेतकरी हिताचा

Published On: 

मुंबई : मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात जमीन देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मराठवाड्यातील ऊस संशोधनात वाढ व्हावी,तेथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे या दृष्टीनेच संस्थेला जमीनरुपी मदत देण्याची भूमिका शासनाने घेतली आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या हिताच्या या निर्णयाचे राजकारण करु नये,असे स्पष्टीकरण राज्याचे अल्पसंख्याक विकास आणि कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिले.

शासनाने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात ५१.३३ हेक्टर जमीन भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल उलट-सुलट बातम्या प्रसिद्ध होत आहेत. त्याअनुषंगाने मंत्री मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरण केले.

मलिक म्हणाले,वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही साखर क्षेत्रात संशोधन करणारी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारी नामवंत संस्था आहे. येथे अनेक आंतरराष्ट्रीय परिषदा,विविध संशोधनपर कार्यक्रम वेळोवेळी होत असतात. देशाचे प्रधानमंत्री यांच्यासह इतर अनेक मान्यवर या संस्थेस भेट देतात. पुण्यात असलेल्या या संस्थेने पश्चिम महाराष्ट्रात ऊस क्षेत्र विकसित करण्यात मोठे योगदान दिले आहे. आता मराठवाड्यातही ऊस क्षेत्र वाढत आहे. तेथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे,तेथील हवामानाच्या अनुषंगाने संशोधन करणे अशा विविध उद्देशांच्या अनुषंगाने शासनाने या संस्थेला संबंधित जमीन भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यासंदर्भातील फाईलवर स्वाक्षरी करुन ही जागा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला देण्यासंदर्भात मंत्रिमंडळाकडे जाण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला होता,असे त्यांनी सांगितले.
संबंधित जागा ही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला विकत देण्यात आली नसून अटी शर्तींवर भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जागेचा वापर मराठवाड्यातील ऊस संशोधनासाठी करण्यात येईल. मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय असून त्याचे राजकारण करु नये,असे मंत्री मलिक यांनी स्पष्ट केले. ही जागा कृषी विभागाने बीजगणन केंद्राच्या उभारणीसाठी संपादित केली होती. पण ती बऱ्याच दिवसांपासून पडीक होती. त्यामुळे आता मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित साधण्याच्या दृष्टीने ही जागा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला देण्याचा निर्णय घेण्यात आला,असे ते म्हणाले.

खासदार शरद पवार हे या संस्थेचे विश्वस्त आहेत. इतरही अनेक आमदार,मंत्री या संस्थेचे विश्वस्त आहेत. ही जागा खासदार श्री. शरद पवार यांना दिली असे म्हणणे हे लोकांची दिशाभूल करणारे आहे. ही जागा खासदार शरद पवार यांना दिली नसून ती वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला देण्यात आली आहे हे लक्षात घ्यावे,असेही मंत्री मलिक यांनी स्पष्ट केले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!