Share

नॅथन लायनने ‘हा’ फोटो शेअर करून मानले टीम इंडियाचे आभार

Published On: 

ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना द गॅबा स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने ३ विके्टसने विजय मिळवत इतिहास रचला आहे. या विजयासह भारताने २-१ ही मालिका जिंकली आहे. भारताचा हा ऑस्ट्रेलियन भूमीतील सलग दुसरा मालिका विजय आहे. याचबरोबर गेल्या ३३ वर्षांचा ऑस्ट्रेलियाचा ब्रिस्बेन कसोटीत अपराजित राहण्याचा विक्रमही भारताने खंडीत केला आहे.

ब्रिस्बेनमध्ये झालेला अखेरचा सामना 3 विकेट राखून जिंकल्यानंतर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनला एक गिफ्ट दिलं होतं. सामना संपल्यानंतर भारतीय संघातील सर्व खेळाडूंनी एका जर्सीवर स्वाक्षरी करुन लायनला १०० कसोटी सामने खेळण्याची कामगिरी केल्याबद्दल भेट दिली होती.

https://www.instagram.com/p/CKh6OyeDmhX/?utm_source=ig_web_copy_link

नॅथन लायनने आता या जर्सीचा फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या जर्सीवर अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्मासह एकूण16 खेळाडूंची स्वाक्षरी आहे. फोटो शेअर करताना लायनने भारतीय संघासोबतच अजिंक्य रहाणेचं विशेष कौतुक केलंय. मालिका विजयाबद्दल अजिंक्य रहाणे आणि टीम इंडियाचं त्याने अभिनंदन केलं आहे. अजिंक्य रहाणेच्या खिलाडूवृत्तीचं नॅथन लायनने विशेष कौतुक केलं असून रहाणेला टॅग करुन त्याचे आभारही मानलेत. तसेच टीम इंडियाने सर्व खेळाडूंची स्वाक्षरी असलेली जर्सी दिल्याबद्दलही लायनने आभार मानले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!