Share

Nashik Accident | “सकाळी मला कंडक्टरचा फोन आला, तो पॅसेंजरला उठवायला मागे गेला अन्…”, कंपनीने सांगितला ‘तो’ प्रसंग

Published On: 

नाशिक : नाशिक (Nashik Accident) येथे अतिशय थरारक अशी घटना घडली आहे. प्रायव्हेट बसमधून प्रवास करणारे प्रवासी गाढ झोपेत असतानाच पहाटे काळाचा घाला आला. नाशिक येथील मिरची चौक येथे एका प्रायव्हेट लक्झरी बसचा टँकर सोबत भीषण अपघात झाला. अशातच चिंतामणी कंपनी यांनी अपघाता वेळीचा एक प्रसंग सांगितला आहे.

चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या संचालकाने सांगितला तो प्रसंग –

चिंतामणी ट्रॅव्हल्स (Chintamani Travels) संचालक गुड्डू जयस्वाल यांनी अपघाता वेळी कंडक्टरचा फोन आला असल्याचं सांगितलं आहे. सकाळी कंडक्टरचा फोन आला आणि त्याने मोठा अपघात झाला असल्याचं सांगितलं. तो मला एवढेच म्हणाला असून त्यालाही नेमकं काय झालं हे कळालं नसल्याचं गुड्डू जयस्वाल यांनी सांगितलं आहे.

अपघाता वेळी कंडक्टर बसच्या मागच्या बाजूला गेला होता, एका पॅसेंजर ला उठवायला कंडक्टर गेला असतानाच तितक्यात हा अपघात घडला. त्यामुळे नक्की काय झालं हे त्यालाही नीट समजलं नाही, असं जयस्वाल यांनी सांगितलं आहे.

प्रवासा आधी बसचा फिटनेस मेंटेनन्स नियमितपणे तपासला जातो, प्रत्येक फेरीपूर्वी ही तपासणी केली जाते अशी माहिती संचालकांनी दिली आहे. मात्र, शॉर्टसर्किट झाल्याने बस ने पेट घेतला असू शकतो, असा अंदाज ट्रॅव्हल कंपनीच्या संचालकांनी वयक्त केला आहे. या बस मध्ये प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त भरले असल्यास आरोप केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिला आहे.

नाशिक येथे भीषण अपघात –

नाशिक येथील मिरची चौकात ही धक्कादायक घटना घडली आहे. चिंतामणी ट्रॅव्हल्सची प्रायव्हेट लक्झरी बस मिरची चौकात असताना टँकरसोबत धडकली. यानंतर बस 50 ते 60 फूट पुढे घसरत गेली तर टँकर 70 ते 80 मीटर पुढे जाऊन थांबला. या अपघातानंतर बसने पेट घेतला. यामध्ये १२ प्रवाश्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, या अपघातात १२ जणांचा मृत्यू धाल्याचं समोर आलं आहे. यावेळी अनेक प्रवाश्यांनी खडकीतून उडी मारुन त्यांचा जीव वाचवला. तब्बल अर्धा तास या गाडीने पेट घेतला.

दरम्यान, ही घटना लोकांच्या निदर्शनास येताच खळबळ उडाली असून पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. या अपघातात जखमी झालेल्या ३४ जणांवर उपचार सुरु आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!