Share

कोरोनामुळे नर्सी नामदेवची आषाढी एकादशीची यात्रा रद्द

Published On: 

🕒 1 min read

हिंगोली : संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील नर्सी नामदेव येथील मंगळवारी (ता. २०) होणारी आषाढी एकादशीची यात्रा रद्द करण्यात आली आहे. भाविकांना या परिसरातील उत्सवात सहभागी होण्यास प्रतिबंध करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिलेत.

संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नर्सी नामदेव येथे दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त मोठी यात्रा भरते. या वेळी परिसरातील हजारो वारकरी व भाविक संत नामदेव महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी येतात. या दिवशी दिवसभरात सुमारे दोन ते तीन लाख भाविक दर्शन घेतात. आषाढी एकादशीनिमित्त होणाऱ्या या सोहळ्यात होणारी गर्दी लक्षात घेऊन यात्रा रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जयवंशी यांनी काढले आहेत.

या ठिकाणी आषाढी एकादशीनिमित्त होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यात्रा रद्द करण्यात आल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय या परिसरात उत्सवामध्ये भाविकांना सहभागी होण्यास प्रतिबंध करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!