यवतमाळ: पुलवामाच्या भ्याड ह्ल्यानंतर देशातील जनतेमध्ये निर्माण झालेला असंतोष मी समजू शकतो. यामध्ये महाराष्ट्रातील जवान देखील शहीद झाले आहेत. मात्र जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाहीत. या अपराध्यांना शिक्षा, कशी, कुठे दिली जाईल ते आमचे जवान ठरवतील, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विदर्भातील विविध विकासकामांचे भूमिपूजन केले जात आहे. यवतमाळ येथील पांढरकवडा येथे झालेल्या कार्यक्रमात बोलत असताना मोदी यांनी दहशतवाद्यांना चोख उत्तर दिले जाईल, असे सांगितले. दहशतवादी संघटनांची कितीही लपण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना शोधून शिक्षा दिली जाईल. देशातील जनतेने धीर धरत जवानांवर विश्वास ठेवण्याच आवाहन मोदींनी केले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पांढरकवडा येथील कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर या गावामध्ये ‘मोदी गो बॅकचे पोस्टर्स लावण्यात आले होते. पोस्टर्सबद्दलची माहिती मिळताच पोलसांनी ते हटवले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

