टीम महाराष्ट्र देशा – जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. पाश्चिमात्य देश कोरोना पुढे हतबल दिसून येत आहे. तर दुसरीकडे कोरोना विरोधात सुरु असलेल्या लढाईत भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जे प्रयत्न केलं आहेत त्याचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या जगातील सर्वात बड्या नेत्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्या स्थानावर आहेत.
याबाबत अमेरिकेच्या डाटा रिसर्चर मॉर्निंग कन्सल्टने अमेरिकेत कोरोनामुळे होणाऱ्या परिणामांवर रिसर्च केला. त्यासोबतच त्यांनी कुठल्या देशातील अध्यक्ष कोरोनावर मात करण्यासाठी किती प्रयत्न करत आहेत, यावरही रिसर्च केला. या रिसर्चमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची तुलना जगभरातील १० देशांच्या नेत्यांशी करण्यात आली आहे.
मॉर्निंग कन्सल्टने १ जानेवारी २०२० पासून ते १४ एप्रिल २०२० दरम्यान अमेरिका आणि अमेरिकेच्या बाहेरील सर्व माहिती संकलित केली आहे. या माहितीच्या आधारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोरोनाची लढाई लढणाऱ्या १० नेत्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. या यादीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आठव्या स्थानावर आहेत. तर जपानचे राष्ट्रपती शिन्जो आबे हे दहाव्या स्थानावर आहेत.
क्रमवारी –
१) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी
२) मेक्सिकोचे राष्ट्रपति अॅन्ड्रेस मॅन्युअल लोपेझ ओब्राडोर
३) ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन
४) ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन
५) कॅनाडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो
६) जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल
७) ब्राझीलचे अध्यक्ष जेयर बोलसनॉर
८) अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
९) फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन
१०) जापानचे पंतप्रधान शिन्जो आबे
Look at how stable Trump's approval rating is compared to other world leaders pic.twitter.com/hH7zTgsQ0y
— Michael Tracey (@mtracey) April 21, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

