नवी दिल्ली : बॉलिवूड क्वीन कंगना रणौतने पंतप्रधान नरेंद्र मोदींच कौतुक केलय. पंतप्रधान पदासाठी मोदीच योग्य उमेदवार असून,देशाच्या हितासाठी त्यांना पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची संधी द्यायला हवी असं कंगनाने म्हंटलं आहे.
कंगना म्हणाली की, २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्येही नरेंद्र मोदीच जिंकून आले पाहिजेत. कारण देशाला खड्ड्यातून वाचवण्यासाठी फक्त पाच वर्ष उपयोगाचे नाहीत. शनिवारी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बालपणावर चित्रीत करण्यात आलेल्या ‘चलो जीते हैं’ या लघुपटाच्या प्रीमिअरला कंगना आली होती. मंगेश हदावले दिग्दर्शित हा लघुपट २९ जुलैला प्रदर्शित होणार आहे. यात मोदींचे बालपण कसे होते ते दाखवण्यात येणार आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

