टीम महाराष्ट्र देशा: काश्मीरमधील कलम ३७० हटवण्यार कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची विरोधात भूमिका होती. तुम्हाला जर एवढाच कळवला असेल तर काश्मीरला जाऊन या. राजकीय स्वार्थासाठी निवडणुकांमध्ये कलम ३७० चं महाराष्ट्रात काय घेणं देणं, असं विचारल जात आहे. परंतु महाराष्ट्रातील जवानांनी काश्मीरमधील शांततेसाठी बलिदान दिले आहे. त्यामुळे काश्मीरमध्ये शांततेसाठी हटवलेल्या कलम ३७०चा महाराष्ट्राशी संबंध कसा नाही?, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. अकोला येथे महायुतीच्या प्रचारादरम्यान ते बोलत होते.
जम्मूमधील लोक हे देखील भारतीयचं आहेत. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामधील जवानांनी शांततेसाठी काश्मीरमध्ये बलिदान दिले आहे. त्यांनी देशाच्या शत्रूंशी लढा दिला आहे. आम्हाला राज्यातील या जवानांच्या बलिदानाचा अभिमान आहे. पण केवळ स्वतःच कुटुंब सांभाळणारे लोक महाराष्ट्राचा जम्मू काश्मीरशी काय संबंध असं विचारतात. त्यांना लाज वाटायला हवी, असा घणाघात नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
कधीकाळी महाराष्ट्रामध्ये दिवसागणिक बॉम्ब स्फोट होत होते, बॉम्बस्फोट करणाऱ्यांची नावे समोर आल्यावर ते देशातून पळून गेले. आता यामध्ये नवीन नवे पुढे येत आहेत. त्यामुळे असे लोक तपास यंत्रणा आणि भारत सरकारला बदनाम करत आहेत, अशी टीका मोदी यांनी केली आहे. तसेच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भ्रष्टवादी युतीने राज्याला दहा दशकं मागे ढकलल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

