Share

तर काश्मीरचा एक हिस्सा पाकिस्तानकडे गेलाच नसता- नरेंद्र मोदी

Published On: 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठराव आज (बुधवार) लोकसभेत मांडला. दरम्यान विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे लोकसभेत गोंधळ निर्माण झाला होता. नरेंद्र मोदींचे भाषण संपेपर्यंत विरोधकांनी घोषणा दिल्या. घोषणाबाजीमुळे पंतप्रधान मोदी यांना भाषण करता येत नव्हते.  दुसरीकडे  मोदींनी देखील काँग्रेसवर जोरदार टीका केली. ‘ज्यांनी कायम घराणेशाहीच केली त्यांनी लोकशाहीबद्दल बोलू नये.’ अशा शब्दात मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.

‘क्या हुआ, क्या हुआ, 15 लाख का क्या हुआ’ – ‘क्या हुआ, क्या हुआ, 15 लाख का क्या हुआ?,  नही चलेगी, नही चलेगी जुमलेबाजी नही चलेगी…’  या घोषणांनी विरोधकांनी अक्षरश: सभागृह दणाणून सोडलं. आंध्रप्रदेशला अर्थसंकल्पात कमी निधी दिल्यामुळे विरोधकांसह टीडीपीच्या खासदारांनी मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तब्बल दीड तास विरोधकांची घोषणाबाजी सुरुच होती.

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे :

वल्लभभाई पटेल हे पहिले पंतप्रधान असते तर…
‘इतिहासात काय घडलं ते मी तुम्हाला सांगतो. जेव्हा काँग्रेस कमेटीची निवडणूक झाली होती त्यावेली 12 पैकी 9 सदस्यांनी सरदार पटेल यांची निवड केली होती. तर 3 जणांनी नोटाला पसंती दिली होती. देशाचे पहिले पंतप्रधान जर सरदार वल्लभभाई पटेल असते तर काश्मीरचा एक हिस्सा पाकिस्तानकडे गेलाच नसता. संपूर्ण काश्मीर हा भारतातच राहिला असता.’ असं मोदी यावेळी म्हणाले.

…म्हणून तेव्हा देशाचा विकास झाला नाही-
‘सुरुवातीच्या काळात पंचायतपासून संसदेपर्यंत तुमच्याचा झेंडा होता. पण इतिहास विसरुन सर्व शक्ती फक्त एकाच कुटुंबाचं गुणगान गाऊ लागला. त्यामुळेच देशाचा विकास झाला नाही.’ असं म्हणत मोदींनी काँग्रेसच्या घराणेशाहीवर निशाणा साधला.

‘तुम्ही केलेल्या विभाजनाची किंमत आजही देशाला चुकवावी लागते’
‘ज्यावेळी अटलबिहारी यांच्या सरकारने तीन राज्यांची निर्मिती केली होती. त्यावेळी ते निर्णय ऐतिहासिक होते. पण जेव्हा तुम्ही देशाचं विभाजन केलं. त्याची किंमत आजही देशाला चुकवावी लागत आहे. तुम्ही (काँग्रेस) देशाचे तुकडे केले?’ अशा शब्दात मोदींनी काँग्रेसवर टीका केली.

‘लोकशाही आमच्या रक्तात आहे’
‘नेहरु यांनी लोकशाही देशाला दिली. हे ऐकून मी हैराण झालो. लिच्छवी साम्राज्य आणि बौद्धाच्या वेळी लोकशाही सुरु होती. त्यामुळे काँग्रेस आणि नेहरुंनी देशाला लोकशाही दिलेली नाही. खर्गे हे एका कुटुंबाची भक्ती करुन इथे बसले आहेत. पण तुम्ही जगतगुरु बसवेश्वर यांचं नाव घेण्यास विसरु नका. लोकशाही आमच्या रक्तात आहे, लोकशाही आपली परंपरा आहे.’ असा टोलाही मोदींनी हाणला.

‘आम्ही जनतेच्या डोळ्यात धूळ फेकत नाही’
‘आम्ही जे काम हातात घेतो ते पूर्ण करण्याचं प्रयत्नही करतो. जनतेच्या डोळ्यात धूळ फेकत नाही. मागील सरकारने केलेल्या चुका आम्ही आता निस्तारत आहोत. सत्ता येते आणि जाते पण देश कायम राहतो.’ असंही मोदी यावेळी म्हणाले.

‘काँग्रेस शाहनिशा न करता अनेकांना कर्ज वाटली’
‘काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी कोणतीही शाहनिशा न करता मागेल त्याला कर्ज दिलं. त्याचे मोठे दुष्परिणाम आज पाहायला मिळत आहेत. पण आमच्या सरकारने ही पद्धतच बंद केली. त्यामुळे देशाचं मोठं नुकसान रोखता आलं.’ असं पंतप्रधान म्हणाले.

VIDEO- लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची शेरो-शायरीतून काँग्रेसवर टीका

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!