🕒 1 min read
रत्नागिरी: गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. दरवर्षी लाखो चाकरमानी मुंबई, पुण्यासारख्या शहरांतून कोकणातील आपल्या गावी गणेशोत्सव साजरा करायला जात असतात. त्यामुळे चाकरमानी आणि गणेशोत्सव हे समीकरणच बनलेले आहे. कित्येक महिने अगोदर विशेष रेल्वेगाड्या व एसटी बसेसचे आरक्षण फुल्ल होत असते. यंदा, गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट गडद झाले आहे. गेले अनेक दिवस कोणतीही नियमावली न आल्याने गणेशभक्तांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.
मात्र, आता राज्य सरकारतर्फे परिवहन मंत्री अनिल परब यांनी नियमावली सांगितली आहे. “गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेक चाकरमानी कोकणात निघाले आहेत. त्यांनी 12 ऑगस्टपर्यंत कोकणात पोहोचणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर त्यांना केवळ दहा दिवसच होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे. तसेच जे चाकरमानी एसटीने प्रवास करतील त्यांना ई-पासची आवश्यकता नाही,” असे अनिल परब म्हणाले.
…अन प्रियंका गांधी-वाड्रांनी दिला ‘जय सियाराम’चा नारा!
“कोकणवासियांसाठी एसटीची सेवा सुरु केली जाणार आहे. जर 22 जण एकत्रित असतील आणि त्यांनी ग्रुप बुकिंग केले तर थेट गावापर्यंत विशेष एसटी दिली जाईल. या प्रवासात एसटी कुठेही थांबणार नाही. आज (4 ऑगस्ट) संध्याकाळी 6 पासून ऑनलाईन बुकिंगला सुरुवात होणार आहे. हव्या तितक्या बस सोडल्या जातील. मात्र गर्दी करु नका,” असेही आवाहन अनिल परब यांनी केले.
आई-बापाने शिक्षणासाठी शेत विकलं, पोराने कलेक्टर होऊन पांग फेडले !
तर, गेले अनेक दिवस विरोधी पक्ष भाजपाने राज्य सरकारने कोणतीही नियमावली जाहीर न केल्याने चाकरमान्यांची होणाऱ्या गैरसोयी बद्दल जाब विचारला जात होता. तसेच, ई-पासमध्ये दलालीबाजी व सार्वजनिक वाहतुकीची सोय नसल्याने खाजगी वाहनांची व्यवस्था करून जावे लागत होते, त्यामुळे आर्थिक फटका देखील सहन करावा लागत होता.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आरोग्योत्सव,प्लाझ्मादान शिबीराचे पवारांच्या हस्ते उदघाटन
त्यामुळे, ई-पासच्या आवश्यकतेबाबत देखील अनिल परब यांनी स्पष्टता केली आहे. “जे प्रवाशी एसटीने जातील, त्यांना ई-पासची गरज असणार नाही. मात्र इतर वाहनांनी जाणाऱ्यांसाठी ई-पास गरजेचा असणार आहे. खासगी बस वाल्यांनी एसटी भाड्यापेक्षा दीडपटचं भाडे घ्यावे. जर याबाबतच्या तक्रारी आल्या तर कारवाई केली जाईल.” त्यामुळे या नियमावलीचा सर्व चाकरमान्यांना काही अंशी दिलासा मिळत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
