Share

घरात बसून सरकार चालवणारा मुख्यमंत्री इतिहासात पाहिला नाही, नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

Published On: 

मुंबई : राज्य चालवण्याचा कुठलाही अनुभव मुख्यमंत्र्यांना नाही. सरकारमध्ये आपसात मतभेद आहेत. त्यामुळं सरकारी यंत्रणांवर अंकुश नाही. घरात बसून आदेश काढले जातात. घरात बसून सरकार चालवणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या इतिहासात मी आजवर पाहिला नाही, असा टोला भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. ते ‘बीबीसी मराठी’शी बोलत होते.

राज्यातील करोनाच्या स्थितीवरून नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर हल्ला चढवला. ‘करोनाचा रोखण्यात राज्य सरकार पुरतं अपयशी ठरलं आहे. महाराष्ट्रात ८ हजारांहून अधिक मृत्यू झाले आहेत. लोकांचे मृतदेह ठेवायला जागा नाही. रुग्ण वाढत आहेत. जनतेची सुरक्षा करण्यास हे सरकार असमर्थ आहे. लॉकडाऊन घोषित केलं जात पण त्यांची अंमलबजावणी नीट होत नाही. देशातील करोना रुग्णांचे आकडे महाराष्ट्रामुळं वाढलेले आहेत. जनता बेजार झाली आहे. हे सरकार बदलल्याशिवाय करोना जाणार नाही,’ अशी टीका राणेंनी केली.

दत्ताकाकांच्या निधनाने राष्ट्रवादीने महत्त्वाचा शिलेदार गमावला, जयंत पाटलांना शोक अनावर

२०१९च्या निवडणुकीनंतर थेट शरद पवार यांच्याकडून भाजपशी युती करण्याचा प्रस्ताव आला होता. पण ऐनवेळी पवारांनी वेगळी भूमिका घेतली, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी अलीकडंच केला होता. त्याबद्दल राणे यांनी आपलं मत मांडलं. ‘राजकीयदृष्ट्या शरद पवारांवर विश्वास ठेवणं कितपत योग्य आहे हा प्रश्नच आहे. शरद पवार हे काहीही घडवू शकतात,’ असं राणे म्हणाले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने बडा शिलेदार गमावला, कोरोनाने दत्ताकाकांचं निधन

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!