Share

दत्ताकाकांच्या निधनाने राष्ट्रवादीने महत्त्वाचा शिलेदार गमावला, जयंत पाटलांना शोक अनावर

Published On: 

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. आज (शनिवारी) सकाळी चिंचवड येथील खासगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले आहे. साने यांना 25 जून रोजी कोरोनाची लागण झाली होती.

साने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक होते. चिखली परिसरातून तीनवेळा ते निवडून आले होते. लॉकडाउन कालावधीत त्यांनी नागरिकांना मोठी मदत केली. अन्नधान्यांचे वाटप केले होते.

25 जून रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्यावर चिंचवड परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना कोरोनासह न्युमोनियाची देखील लागण झाली होती. दत्ता साने हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक होते. चिखली परिसरातून ते तीनवेळा ते निवडून आले होते. लॉकडाउन कालावधीत त्यांनी नागरिकांना मोठी मदत केली होती. कोणीही उपाशी राहू नये यासाठी अन्नधान्यांचे वाटप केले होते. यामुळे साने यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने बडा शिलेदार गमावला, कोरोनाने दत्ताकाकांचं निधन

दरम्यान, दत्ता साने यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी हर्षदा, 19 वर्षीय मुलगा आणि 16 वर्षीय मुलगी तर दोन भाऊ असा मोठा परिवार आहे. दत्ता यांच्या अशा जाण्यामुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. दत्ता साने हे ‘दत्ताकाका’ नावाने अख्खा चिखलीमध्ये प्रसिद्ध होते. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक होते.

तर दत्ता साने यांच्या निधनाने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शोक व्यक्त केला आहे. ‘पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ताकाका साने यांच्या निधनाची बातमी नुकतीच समजली. दत्ताकाका साने यांच्या निधनाने राष्ट्रवादीने पिंपरी-चिंचवड शहरात पक्षाचा महत्त्वाचा शिलेदार गमावला आहे. त्यांचा परिवार व त्यांचे कार्यकर्ते यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत’. अस जयंत पाटील म्हणाले आहेत.

चिंताजनक : राज्यात आज कोरोनाच्या ६३६४ नवीन रुग्णांचे निदान

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!