Share

Congress | काँग्रेस पक्षाने यंदाच्या महापालिका निवडणुकांबाबत केली ‘ही’ मोठी घोषणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  सध्या महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. निवडणुकीचं वारं सगळीकडे घुमू लागलं असून, राज्यातील सर्व पक्ष आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी करायाला लागले असल्याचं दिसून येतं आहे. त्याचबरोबर कोणता-पक्ष कोणत्या पक्षाशी युती करणार याबद्दलही अनेक चर्चा सध्या सुरू आहेत. अशातच काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक घोषणा केली आहे.

काँग्रेस पक्ष आगामी निवडणुका लढणार स्वबळावर –

काँग्रेस पक्ष आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षासोबत करणार नसून, स्वबळाबर निवडणुक लढवणार असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं आहे. रविवारी काँग्रेस ओबीसी विभागातर्फे औरंगाबाद येथील रस्त्यावरील धनलक्ष्मी सभागृहात मंथन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याठिकाणी नाना पटोले देखील उपस्थित होते. कार्यक्रम झाल्यानंतर पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलले.

नाना पटोले म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात. त्यांना त्या लढण्याची संधी मिळायला हवी. त्यामुळे नाशिकसह सर्व महापालिकांच्या निवडणुका काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर पुढे त्यांनी असंही सांगितलं की,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस महाविकास आघाडीसोबत लढणार आहे.

तसेच, नाना पटोले यांनी बोलताना भारतीय जनता पार्टीवरही निशाणा साधला आहे. भाजप हा अतिशय प्रबळ पक्ष असल्याचे चित्र प्रसार माध्यमांतून रंगविले जाते. परंतु लोकशाहीतील तो सर्वात कमकुवत पक्ष असून भय व भ्रष्टाचारावर ते राजकारण करीत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!