🕒 1 min read
नागपूर : नागपूरच्या चिटणीस सेंटरमध्ये ‘एक पहल अभिनव गाव की ओर’ या कार्यक्रमात बोलताना जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर चांगलीच स्तुतिसुमने उधळली आहे. या कार्यक्रमात गडकरी आणि जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची मुलाखत झाली, ज्यामध्ये बोलताना दोघांनीही आपल्या-आपल्या क्षेत्रातील अनुभव कथन केले.
नाना पाटेकर म्हणाले, ‘नितीन गडकरी असं व्यक्तिमत्व आहे ते ज्या कामाला हात लावतात ते सहज पूर्ण होतं’. राजकारण करत असताना गडकरी प्रेमाने दुसऱ्याचे कान टोचतात. मात्र, विरोधक सुद्धा त्यांचा विरोध करत नाही.
नाम फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करायला सुरुवात केली आणि 60 कोटी रुपये सामान्य लोकांनीच या उपक्रमासाठी दिलेत, हे सगळ्यात मोठ यश आहे. प्रत्येक गोष्टीसाठी सरकारवर अवलंबून राहण्यापेक्षा जेवढे जमेल तेवढे आपण करावे, नोकऱ्या कमी होतात त्यामुळे आपण उद्योजक नोकरी देणारे कसे होऊ हे बघितले पाहिजे.
पुढे बोलताना नाना म्हणाले, शेतकऱ्यांच्या मालाला अजून भाव मिळत नाही, पण मॉलमध्ये जाऊन आपण त्या मालाला किंमत देता. त्यामुळे नागरिकांनीच आपल्या शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे नाना यावेळी बोलतांना म्हणाले.

