Share

अखेर नागराज मंजुळेंनी विद्यापीठ मैदानावरील सेट काढण्यास केली सुरवात !

Published On: 

🕒 1 min read

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मैदानावर असलेला दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सिनेमाचा सेट काढण्याचं काम सुरु करण्यात आलं असल्याची घोषणा मंजुळे यांनी फेसबुक पोस्टद्वारे केली आहे. मंजुळे यांच्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मैदान भाड्याने देऊन लीज कराराचा भंग केल्याचा ठपका पुणे शहर तहसील कार्यालयाने विद्यापीठावर ठेवला होता.चित्रपटाच्या शूटिंगसाठी नियमबाह्य पद्धतीने उभारलेला सेट ७ दिवसात काढण्याच्या सूचना नागराज मंजुळे यांना दिल्या. मात्र नोटीस बजावून १५ दिवस झाले तरी शूटिंगसाठी उभारलेला सेट जैसे थे स्थितीत होता.

सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाने मंजुळे यांच्या आगामी हिंदी चित्रपटाच्या शुटींगसाठी ६ लाख रुपये भाडेतत्वावर मैदान भाड्याने दिले. नागराज मंजुळेंवर मेहरबानी करत विद्यापीठाने नाममात्र शुल्क आकारून मैदान शुटींगसाठी दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आल्यानंतर माध्यमांनी हे प्रकरण उचलून धरले. विद्यापीठाने कुणालाही न जुमानता मंजुळेना मैदान भाड्याने दिले. शासनाच्या अंतर्गत येणारी कोणतेही जमीन भाड्याने द्यायची असेल तर राज्य सरकार, विद्यापीठाची व्यवस्थापन परिषद आणि उच्चशिक्षण संचालनालय यांची परवानगी घेण आवश्यक असते.

मात्र कुलगुरूंनी यापैकी कुणाचीही परवानगी न घेता मनमानी करून मैदान भाड्याने देण्याचा परस्पर निर्णय घेतला होता. या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालय आणि उच्चशिक्षण संचालनालय यांच्याकडे करण्यात आली. त्यानंतर या दोन्ही विभागांनी विद्यापीठाची चौकशी करून विद्यापीठाला नोटीस बजावली होती. अखेर मंजुळे यांना ७ दिवसात शुटींग साठी उभारण्यात आलेला सेट काढण्याचे आदेश विद्यापीठाकडून देण्यात आले होते.

दरम्यान, राज्याचे उच्चशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी ७ फेब्रुवारी रोजी विद्यापीठाची पाहणी केली होती. तेव्हा त्यांनी पत्रकार परिषेद घेऊन चित्रपटाचा सेट काढण्याचे आदेश द्यावेत अन्यथा सेट जप्त करावा अशा सूचना सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मात्र १५ दिवस उलटले तरी विद्यापीठाला या सूचनेचे गांभीर्य नसल्याचे स्पष्ट होत आहे. यानंतर कुलगुरू नितीन करमळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन ७ दिवसात शुटींग साठी उभारण्यात आलेला सेट काढण्याचे पत्र दिले असल्याचे सांगितले होते.

काय आहे नागराज मंजुळे यांची फेसबुक पोस्ट

माझ्या हिंदी फ़िल्मचं शूटिंग काही तांत्रिक अडचणींमुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. कालपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मैदानावर उभा असलेला सेट काढण्याचे काम सुरु झाले आहे. सेट बांधण्याइतकेच फ़िल्मचा सेट काढून घेणेही जरा जिकिरीचे काम असल्याने आणखी काही दिवसांच्या अवधित सेट काढण्याचे काम पूर्ण होइल.

विद्यपीठाने केलेल्या सहकार्याबद्दल मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अत्यंत ऋणी राहीन.

आभार आणि सदिच्छा !!

-नागराज

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!