Share

जलयुक्त शिवारमुळे शेतीला शाश्वत सिंचनाचा लाभ – प्रा. राम शिंदे

Published On: 

नागपूर  : टंचाईमुक्त राज्याची संकल्पना साकार करताना शिवारात पडणाऱ्या पावसाचे पाणी अडविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत जलसंधारणाचे कामे मोठ्या प्रमाणात घेतल्यामुळे कमी पर्जन्यमानानंतरही शेतकऱ्यांना शेतातील पिकांचे संवर्धन करण्यासाठी पाणी उपलब्ध होत आहे. जलयुक्त शिवार हा महत्वकांक्षी कार्यक्रम ग्रामीण भागात समृध्दी आणण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानांमध्ये जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यामधल्या आंजनगाव येथील सिमेंट नाला बंधाऱ्याच्या खोलीकरणाअंतर्गत उपलब्ध झालेल्या जलसाठ्याचे विधीवत जलपूजन प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी शेतकरी व ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी शिंदे म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियानामध्ये हिंगणा परिसरातील 58 गावांची निवड करण्यात आली असून विविध यंत्रणांनी नाला खोलीकरण, सिमेंट बांध बंधारे, तलावाचे बांधकाम आदी कामे मोठ्या प्रमाणात झाले असून शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी जलसाठे निर्माण झाले आहे. तसेच भूगर्भातील जलसाठ्यात वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन करुन वापर करावा, असे आवाहन प्रा. राम शिंदे यांनी यावेळी केले. टँकरमुक्त महाराष्ट्र ही संकल्पना जलयुक्त अभियानामुळे यशस्वी झाली असून मागील वर्षी चार हजार टँकर कमी झाले आहेत. कमी पावसामुळे उध्दभवलेल्या परिस्थितीत पिकांना पाणी देण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. वेणा नदीच्या खोलीकरणासाठी 18 कोटी रुपयाचा आराखडा तयार करण्यात आला असून यावर्षी 2 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. नदी पुनर्जीवनाच्या कामासाठी आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी गवाही जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिली. आमदार समीर मेघे यांनी आंजनगाव येथील शिवारात बांधण्यात आलेल्या सिंमेट नाला बांध गाळामुळे पाणी साठवणूक क्षमता संपलेली होती. येथील नाला खोलीकरणामुळे 11.72 टीसीएम पाणी उपलब्ध झाले आहेत. त्यासोबत भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे शेतातील विहिरींच्या पातळीत वाढ झाली आहे. हिंगणा तालुक्याची जीवनदायनी असलेल्या वेणा नदीचे खोलीकरण व पुनर्जीवन आवश्यक असून यासाठी 18 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी यावेळी केली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!