Share

‘मी लिहून देतो, यामध्ये अजित पवारांचे नाव नसते तर गुन्हाही दाखल झाला नसता’

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबई येथे पत्रकार परिषद घेत राजीनाम्याबाबत स्पष्टीकरण दिले. राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना माझ्यामुळे त्रास सहन करावा लागला. हे मला पटले नाही. त्यामुळे कुठे तरी वाईट वाटले देशातील मोठ्या नेत्याचे नाव विनाकारण ईडीच्या फाईलमध्ये आले यामुळे या साऱ्या प्रकाराला कंटाळून नैतिक जबाबदारी म्हणून विवेकबुद्धीला स्मरून राजीनामा दिला, असे म्हणत अजित पवारांनी राजीनाम्याबाबत खुलासा केला.

यावेळी अजित पवार म्हणाले की, शिखर बँकेत अनेकजण संचालक पदावर होते. ज्या बँकेत केवळ 12 हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. त्या बँकेत 25 हजार कोटींचा भ्रष्टाचार होतोचं कसा, हे कोणालाच पटणार नाही. पण तरी देखील आरोप झाले. ज्या बँकेत शरद पवारांचा काडीमात्र संबंध नसताना त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येतो. मी तुम्हाला लिहून देतो, की यामध्ये अजित पवारांचे नाव नसते तर गुन्हाही दाखल झाला नसता. त्यामुळे कुठेतरी वारंवार लक्ष्य केले जात आहे, असे म्हणत अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले.

दरम्यान अजित पवार यांनी काल आपला आमदारकीचा राजीनामा दिला होता. यामुळे पक्षातील अनेकांना धक्का बसला होता. या पार्श्वभूमीवर आज अजित पवार यांनी मुंबईत शरद पवारांची भेट घेतली. या भेटी नंतर आपली भूमिका स्पष्टपणे मांडून त्यांनी पत्रकार परिषद घेत राजीनाम्या बाबतचा खुलासा केला.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1177907347496161280?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1177906586250989570?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1177905343059259392?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!