Share

‘माझं नाव राहुल सावरकर नाही राहुल गांधी, मी माफी मागणार नाही’

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : दिल्लीतील ऐतिहासिक अशा रामलीला मैदानावर भारत बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10.30 वाजता रॅलीला सुरुवात झाली. यावेळी केलेल्या भाषणात राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच आक्रमक भूमिका घेत माफी मागण्याच्या मुद्यावरून टीका केली. राहुल गांधी म्हणाले की, माझं नाव राहुल सावरकर नाही तर राहुल गांधी आहे. माझा मृत्यू झाला तरी मी माफी मागणार नाही. मला भाजप खासदारांनी माफी मागावी असं म्हटलं आहे. मी योग्य बोललो त्यासाठी माफी मागण्यास सांगितलं जात आहे. माझं नाव राहुल सावरकर नाही. माझं नाव राहुल गांधी आहे. मी सत्यासाठी कधीच माफी मागणार नाही असं राहुल गांधी म्हणाले. काँग्रेसकडून कोणीही माफी मागणार नाही. नरेंद्र मोदींनी माफी मागितली पाहिजे. त्यांनी देशाची माफी मागावी. त्याचे सहाय्यक अमित शाहांनी माफी मागितली पाहिजे अस देखील राहुल गांधी म्हणाले.

देशासाठी प्राण देण्यास काँग्रेस कार्यकर्ता तयार आहे. मोदींच्या तडाख्याने भारतीय अर्थव्यवस्था ढासळली. जीडीपीचा दर 9 टक्क्यांवरून साडेचार टक्क्यांवर आला आहे. गब्बरसिंग टॅक्सने देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करून ठेवली. मोदींचे निर्णय याला कारणीभूत आहेत. भारताचे शत्रू जे विचार करत होते, ते काम आज नरेंद्र मोदी करत आहेत. दोन-तीन उद्योगपतींच्या खिशात सर्व पैशे घातले. सध्या देशातील 43 वर्षांतील सर्वांत मोठी बेरोजगारी आहे. असा घणाघात राहुल गांधी यांनी भाजपवर केला आहे.

दरम्यान, फक्त अदानीला 50 कंत्राट मोदींनी दिले आहेत. अदानीला पैसे देणे भ्रष्टाचार नाही का? उद्योगपतींचे 60 हजार कोटींचे कर्ज माफ केले. सर्वसामन्यांचे पैसे अदानी, अंबानी यांना देण्यात आले. देशात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, याची माहिती केंद्र सरकारला नाही. याची सरकारला लाज वाटली पाहिजे. काश्मिर, ईशान्येकडील राज्यांत मोदींनी आग लावून ठेवली आहे. देशाचे विभाजन करण्याचे प्रयत्न सरकार करत आहे. मोदी-शहा देशाला धर्माच्या नावावर वाटण्याचे काम करत आहेत. सध्याची माध्यमे का शांत आहेत. असा सवाल देखील राहुल गांधी यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1205754789876748288?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1205754138773975040?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1205741132816109569?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!