🕒 1 min read
पुणे : गेली कित्येक दशके महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशसारख्या राज्यात अखंड महाराष्ट्रासह देशाचे ऊर्जास्रोत असलेल्या शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने बिडी विकली जात आहे. या बिडीच्या पॅकेटवर महाराजांचे फोटो देखील होता. बिडीच्या उद्योजकांविरोधात याआधी देखील शिवभक्तांकडून आवाज उठवला जात होता. यानंतर अचानक होणारे नुकसान टाळण्यासाठी फोटो व नाव काही काळाने बदलण्याचे आश्वासन या ग्रुप कडून देण्यात आले होते. मात्र तरीही या बिडीचे उत्पादन व विक्री ‘संभाजी बिडी’ या नावाने सुरूच राहिले.
आता शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी साबळे वाघिरे आणि कंपनी या बिडी उत्पादक कंपनीला बिड्यांच्या बंडलावर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा वापर करण्यास मनाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. याचबरोबर शिव-शंभुभक्तांनी याआधी देखील या बिडी उत्पादक कंपनीला नाव बदलण्याची विनंती करून देखील कोणताही प्रतिसाद न दिल्याने खासदार अमोल कोल्हे यांनी संताप व्यक्त केला आहे.
“संबंधित उत्पादकांना याबाबतची कल्पना देऊन शंभूप्रेमी मंडळींनी आपली नाराजी वेळोवेळी व्यक्त करुन सदर विडीचे नाव बदलण्याची विनंती केली.परंतु साबळे आणि वाघिरे कंपनीने याला कसलाही प्रतिसाद दिलेला नाही. यामुळे या विषयावरुन शिवप्रेमी संघटना व जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे नाव विडी सारख्या उत्पादनास असणे ही प्रत्येक राष्ट्राभिमानी नागरिकासाठी खेदाची व संतापजनक बाब आहे. यामुळेच विनंती आहे कि, सदर कंपनीला आपण विडीचे नाव बदलण्याचे निर्देश द्यावेत.” असे ट्विट करत अमोल कोल्हे यांनी ही मागणी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजीराजे समस्त मराठी जनतेचे स्फूर्तीस्थान आहेत.त्यांच्या नावाने विडीसारखे उत्पादन चालविणे सर्वथा अनुचित आहे.साबळे आणि वाघिरे कंपनीने छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने विडी विक्रीस आणली आहे.यामुळे शंभूप्रेमी जनतेमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. pic.twitter.com/8IGxneECAT
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) September 8, 2020
दरम्यान, पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक साबळे-वाघिरे ग्रुपवर गुन्हा दाखल करण्यात आला असून महापुरुषांचा अवमान केल्याची तक्रार शिवधर्म फाऊंडेशन या संघटनेने केली आहे. पुण्यातील सासवड पोलीस ठाण्यात या प्रकरणी काल रात्री गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
ब्रेकिंग न्यूज : ‘संभाजी बिडी’ प्रकरणी उद्योजकांवर गुन्हा दाखल
“देशद्रोही पत्रकार, सुपारीबाज कलावंताना पाठिंबा देणे हीसुद्धा बेईमानीच”
रियाची रवानगी भायखळा जेलमध्ये होणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
