Share

पुण्यातील १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाच्या स्लॉटबाबत महापौरांची महत्वाची माहिती

Published On: 

🕒 1 min read

पुणे : कोरोनावर मात करण्यासाठी देशातील अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेल्या जनता लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहे. मात्र, एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

लसींचा तुटवडा असल्याने मोजक्याच ठिकाणी लसीकरण केले जात आहे. तर, नोंदणी केल्यानंतरच लसीकरण होत असले तरी साठा उपलब्ध झाला नसल्याचे कारण लसीकरण केंद्रावर दिले जात असल्याने अनेक नागरिकांना विना लसीकरणच माघारी यावं लागत आहे. अशातच, ‘राज्यात १ कोटी ८४ लाख लोकांचं लसीकरण झालं आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी ३५ हजार कोवॅक्सिन उपलब्ध आहेत.५ लाख दुसरा डोस द्यायचा आहे. त्यामुळे राज्य सरकारने आज १८ ते ४४ वयोगटातील खरेदी केलेलं कोवॅक्सिन हे आता ४५ पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांसाठी वापरले जाईल,’ अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.

यामुळे १८ ते ४४ गटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत आता संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळेच पुण्यात उद्या १८ ते ४४ गटातील व्यक्तींचे लसीकरण करणाऱ्यांचे स्लॉट आज रात्री बंद राहणार आहेत, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

‘१८ ते ४४ वयोगटासाठीच्या लसीकरणासाठी आवश्यक असणारी बुकिंग आज रात्री ८ वा. उपलब्ध नसेल. लसीकरणासंदर्भात राज्य सरकारकडून निर्देश येणे बाकी असल्याने उद्याच्या लसीकरणासाठीचे बुकिंग उद्या सकाळी ८ वा. करता येईल,’ असं महापौर मोहोळ यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!