Share

कंगणाच्या मुंबईतीला ऑफिसवर महापालिकेचा हातोडा, महानगरपालिकेकडून कारवाई

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: अभिनेत्री कंगना रणौतच्या मुंबईतील कार्यालयावर मुंबई महापालिकेकडून तोडक कारवाईची सुरुवात झाली आहे. कंगना आता मुंबई पालिकेच्या रडारवर आहे. कंगनाच्या मुंबईतील वांद्रे याठिकाणी असणाऱ्या कार्यालयामधील तळमजल्यावर पालिकेच्या तोडकामास सुरुवात झाली आहे. पालिकेची टीम कंगनाच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर दाखल झाली आहे. याठिकाणी असलेल्या कार्यालयामध्ये बेकायदेशीर बदल झाल्याचा आरोप पालिकेकडून करण्यात आला होता. बेकायदेशील बदलांसाठी पालिकेने मंगळवारी नोटीस देखील बजावली होती.

नोटीशीला 24 तास उलटल्यावनंतर पालिकेकडून तोडक कारवाई होत आहे. म्हणजेच याठिकाणी जे कोणते अनधिकृत बांधकाम आहे, त्याच्यावर पालिकेचा हातोडा पडत आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणी अभिनेत्री कंगना रणौतने मुंबई पोलिसांसह शिवसेना नेते संजय राऊत आणि शिवसेनेवर टीकेची झोड उठवली होती. यानंतर, राजकीय वातावरण चांगलेच तापलेल पाहायला मिळालं. काहींनी कंगनाचे समर्थन केले तर काहींनी पोस्टरला जोडे मारून निषेध व्यक्त केला होता.

कंगना आज म्हणजेच ९ सप्टेंबरला मुंबईमध्ये दाखल होत असून गृहमंत्रालयाने तिला ‘वाय+’ सुरक्षा देखील देऊ केली आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेने कंगनाच्या मणिकर्णिका फिल्म्स या मुंबईतील कार्यालयाबाहेर नोटीस लावली आहे. कंगनाने त्याठिकाणचे काम त्वरित बंद करावे अशी नोटीस याठिकाणी लावण्यात आली आहे. परिसरात बेकायदेशीर बांधकाम झाल्याचा आरोप मुंबई महापालिकेने केला आहे.

अभिनेत्री कंगना रणौतवर विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्ताव आणला गेला. यासंदर्भात काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी कंगनाविरोधात हक्कभंग मांडला. कंगना ड्रग्स घेत असल्याचे अभिनेता शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमन याने एका मुलाखतीत सांगितले होते. त्यामुळे कंगना ड्रग्ज घेत असल्याचा आरोप होत आहे. याबाबत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि सुनील प्रभू यांनी तक्रार दाखल होती. याची चौकशी मुंबई पोलिसांमार्फत केली जाणार आहे, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:-

‘हे’ धाडस महाराष्ट्रात होते… आता धुर निघालाच पाहिजे ; नितेश राणेंची आक्रमक भूमिका

मोठी बातमी : सुशांतची बहीण प्रियंकावरही गुन्हा दाखल

कसाबला ‘बिर्याणी’ घालणाऱ्यांसोबत तुम्ही सत्तेची ‘बिर्याणी’ खाताय ना?’

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!