Share

मोठी बातमी : सुशांतची बहीण प्रियंकावरही गुन्हा दाखल

Published On: 

मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर सुरु झालेलं तपासप्रकरण दिवसेंदिवस गुंतागुंतीचे बनत आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण देखील तापलेल पाहायला मिळालं. काल, सुशांत सिंह राजपूतची प्रेयसी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने अटक केली. यानंतर तिला १४ दिवसांची कोठडी देखील सुनावण्यात आली आहे.

तर रिया चक्रवर्तीने दिल्लीतील डॉक्टरसह सुशांतची बहीण प्रियंका विरोधात तक्रार दाखल केली आहे.  प्रियांका सिंह, दिल्लीतील राम मनोहर लोहिया हॉस्पिटलचे डॉक्टर तरुण कुमार आणि अन्य काहीजणांविरोधात वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला आहे, असे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिले आहे. सुशांतला चुकीचे पाऊल उचलण्यास प्रवृत्त  करणे, विश्वासघात करणे आणि कट रचणे हे आरोप प्रियांकावर ठेवण्यात आले आहेत. सुशांतची बहिण प्रियांका सिंह हीच्यावर FIR दाखल करण्यात आल्याचेही वृत्त एका वृत्त वाहिनेने सांगितले आहे.

दरम्यान, 8 जूनला सुशांतने बहिणीसोबतचे चॅट्स मला दाखवले होते, असे रियाने सांगितले. “बहिणीने सुशांतला काही औषधे घ्यायला सांगितली. डॉक्टरांनी सांगितलेलीच औषधे तू घ्यायाला हवीस. बहिणीने सांगितले म्हणून औषधे घेऊ नकोस, कारण त्यांच्याकडे मेडिकल डिग्री नाही, असे सुशांतला आपण सांगितले होते,” असे रियाने स्पष्ट केले असल्याने आता या प्रकरणी अनेक संशय बळावत आहेत.

महत्वाच्या बातम्या:-

गृहमंत्री अनिल देशमुखांना धमक्यांचे फोन वर फोन

कसाबला ‘बिर्याणी’ घालणाऱ्यांसोबत तुम्ही सत्तेची ‘बिर्याणी’ खाताय ना?’

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेला मुख्यमंत्र्यांनी योग्य नाव दिले आहे, कारण… नितेश राणेंचा टोला

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!