Share

माझं राम मंदिर उध्वस्त होतंय;कंगणाने केली ठाकरे सरकारची तुलना बाबराशी!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवसेना आणि कंगणा राणौत यांचा वाद आता शिगेला पोहोचला आहे. मुंबई महापालिकेनं आज तिच्या पाली हिल मधील कार्यालयावर हातोडा टाकला आहे. यावरच कंगणाने आज ट्विट करताना आपल्या कार्यालयाला राम मंदिर म्हणत ठाकरे सरकारची तुलना बाबराशी केली आहे. आज तिथे बाबर आला आहे, पण बाबर तु हे लक्षात ठेव, तिथे पुन्हा राममंदिर उभारलं जाईल, “जय श्रीराम” असं ट्विट करून तिने खळबळ उडवून दिली आहे. आता यावर नवीन वादंग सुरू होण्याची शक्यता आहे.

 

आज अभिनेत्री कंगणा राणौतच्या मुंबईतील कार्यालयावर मुंबई महापालिकेने हातोडा लावला आहे. अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी आजची कारवाई झाली आहे. तिच्या ऑफिसवर हातोडा पडल्याने कंगनाने पुन्हा मुंबईची तुलना पाकिस्तानशी केली आहे. त्यासंदर्भात तिने ट्विट केलं आहे. आता आणखी एका नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. महापालिका कर्मचाऱ्यांनी तिच्या कार्यालयाचे तोडतानाचे फोटो शेयर करत तिने म्हटलं आहे.

आज अभिनेत्री कंगना राणावतच्या मुंबईतील कार्यालयावर मुंबई महापालिकेकडून तोडक कारवाईची सुरुवात झाली आहे. कंगना आता मुंबई पालिकेच्या रडारवर आहे. कंगनाच्या मुंबईतील वांद्रे याठिकाणी असणाऱ्या कार्यालयामधील तळमजल्यावर पालिकेच्या तोडकामास सुरुवात झाली आहे. पालिकेची टीम कंगनाच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर दाखल झाली आहे. याठिकाणी असलेल्या कार्यालयामध्ये बेकायदेशीर बदल झाल्याचा आरोप पालिकेकडून करण्यात आला होता. बेकायदेशील बदलांसाठी पालिकेने मंगळवारी नोटीस देखील बजावली होती. नोटीशीला 24 तास उलटल्यावनंतर पालिकेकडून तोडक कारवाई होत आहे. म्हणजेच याठिकाणी जे कोणते अनधिकृत बांधकाम आहे, त्याच्यावर पालिकेचा हातोडा पडत आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी अभिनेत्री कंगना रणौतने मुंबई पोलिसांसह शिवसेना नेते संजय राऊत आणि शिवसेनेवर टीकेची झोड उठवली होती. यानंतर, राजकीय वातावरण चांगलेच तापलेल पाहायला मिळालं. काहींनी कंगनाचे समर्थन केले तर काहींनी पोस्टरला जोडे मारून निषेध व्यक्त केला होता.

कंगना आज म्हणजेच ९ सप्टेंबरला मुंबईमध्ये दाखल होत असून गृहमंत्रालयाने तिला ‘वाय+’ सुरक्षा देखील देऊ केली आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेने कंगनाच्या मणिकर्णिका फिल्म्स या मुंबईतील कार्यालयाबाहेर नोटीस लावली आहे. कंगनाने त्याठिकाणचे काम त्वरित बंद करावे अशी नोटीस याठिकाणी लावण्यात आली आहे. परिसरात बेकायदेशीर बांधकाम झाल्याचा आरोप मुंबई महापालिकेने केला आहे.

कंगना आज म्हणजेच ९ सप्टेंबरला मुंबईमध्ये दाखल होत असून गृहमंत्रालयाने तिला ‘वाय+’ सुरक्षा देखील देऊ केली आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेने कंगनाच्या मणिकर्णिका फिल्म्स या मुंबईतील कार्यालयाबाहेर नोटीस लावली आहे. कंगनाने त्याठिकाणचे काम त्वरित बंद करावे अशी नोटीस याठिकाणी लावण्यात आली आहे. परिसरात बेकायदेशीर बांधकाम झाल्याचा आरोप मुंबई महापालिकेने केला आहे.

महत्वाच्या बातम्या:-

या कठीण काळात आम्ही कंगनाच्या सोबत ; भाजपचा कंगनाला जाहीर पाठिंबा

‘लोकशाहीचा मृत्यू असं ट्विट करत कंगणाने पुन्हा केली मुंबईची तुलना पाकिस्तान शी’

कंगणाच्या मुंबईतीला ऑफिसवर महापालिकेचा हातोडा, महानगरपालिकेकडून कारवाई

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!