Share

‘महापालिकेने गुंठेवारीच्या अर्जावर तत्काळ कार्यवाही करावी’, अमित देशमुखांचे निर्देश

Published On: 

लातूर: राज्य शासनाने २००१ पूर्वी खरेदी केलेले गुंठेवारीचे प्लॉट योग्य ते कागदपत्रे पाहून नियमित करण्याचे धोरण जाहीर केलेले आहे. त्याप्रमाणे लातूर जिल्ह्यातील गुंठेवारी व अकृषक जमिनीबाबत शासन निर्णयातील तरतुदी प्रमाणे प्रशासनाने कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले. शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात आयोजित कृषी को गुंठेवारी संदर्भात आढावा बैठकीत पालकमंत्री देशमुख बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., महापौर विक्रांत गोजमगुंडे, महापालिका आयुक्त अमन मित्तल व इतर मान्यवर उपस्थित होते.

देशमुख पुढे म्हणाले की, एका गटातील एकाच प्लॉटची खरेदी २००१ पूर्वी झाली असेल तर त्या एकाच प्लॉटला कागदपत्रे पाहून नियमित करता येईल, परंतु संपूर्ण गटाला नियमित करता येणार नाही. त्यामुळे प्रशासनाने लातूर शहरालगतच्या गुंठेवारीचे नियमित करण्याच्या दिलेल्या आदेशाची सखोल चौकशी करावी व त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले. लातूर महापालिकेच्या हद्दीत गुंठेवारी चे अर्ज घेऊन येणाऱ्या नागरिकांचे नियमानुसार व विहित मुदतीत अर्ज निकाली काढावेत. संबंधित नागरिकांना महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले.

शासन निर्णयातील नियमानुसार सन २००१ पूर्वी खरेदी केलेल्या व एन ए लेआउट नसलेल्या प्लॉटला नियमित करता येऊ शकते. गुंठेवारी ला एन ए लेआऊट ची आवश्यकता नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी देऊन बाभळगाव येथील गुंठेवारी नियमित करण्याबाबत देण्यात आलेल्या आदेशाबाबत चौकशी करण्यात येईल, असे सांगितले. प्लॉट ची एन. ए. लेआउट अंतिम झाल्यावरच खरेदीखत होणे आवश्यक आहे. सद्यपरिस्थितीमध्ये इंटेरियम लेआउट वरच खरेदी होत असल्याने त्यात बदल करण्याबाबत कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षा महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!