मुंबई : आज मुंबई भाजप युवा मोर्चाने शिवसेनेविरोधात थेट शिवसेना भवनावर मोर्चा काढण्याचा निर्धार केला होता. याचे कारण होते अयोध्येतील श्री राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादनाबाबत खोटे आणि बनावट आरोप केल्याचा दावा करत भाजपने फटकार मोर्चा आयोजित केला आहे. भाजप युवा मोर्चाने सेना भवनावर कूच करताच, शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले.
सेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठी धुमश्चक्री झाली. एकमेकांना मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आली. पोलिसांनी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना रोखल्यानंतर शिवसैनिकांनी तिकडे धाव घेतल्यानंतर, दोन्ही पक्षात प्रचंड धुमश्चक्री उडाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात यायला सुरुवात झाली. मात्र, शिवसेना भवनापासूनच्या काही किलोमीटर अंतरावर मोठा जमाव अडवण्यात आला असला तरी जे शिवसेना भवन परिसरात कार्यकर्ते आले त्यांच्यात संघर्ष सुरु आहे. यामुळे परिसरात तणाव वाढला आहे.
याप्रकरणी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी प्रतिक्रिया भाजपच्या आंदोलनावर संताप व्यक्त केला आहे. ‘भाजप युवा मोर्चाचं हे आंदोलन चुकीचं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला मुंबई आणि महाराष्ट्र सामोरा जात असून असं आंदोलन केल्याने मुंबई पोलिसांवर अधिक ताण निर्माण झाला. केंद्र सरकारने देखील रामजन्मभूमी बाबतच्या आरोपांवरून अहवाल मागवला आहे. यानंतर सत्य समोर येईल. मात्र, केवळ महापालिका निवडणूक समोर ठेवून हे आंदोलन भाजपने केलं.’ असा आरोप शेवाळे यांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले, ‘मागील पंचवीस वर्षे भाजप शिवसेनेसोबत होती. मात्र, या पंचवीस वर्षांत त्यांना शिवसेना भवनाच महत्व समजलेलं नाही. शिवसेना भवनासमोर जो कोणी आंदोलन करेल त्याला असच उत्तर मिळेल,’ असा इशारा देखील राहुल शेवाळे यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘खोटारड्या मोदी सरकारचा लोकांच्या जीवाशी खेळ; जीवापेक्षा मोदींचे प्रतिमा संवर्धन महत्वाचे आहे का?
- ‘ते राणीच्या बागेत आंदोलन करत नव्हते, शिवसेना भवनाची गरिमा आहे’; शिवसेना नेता संतापला
- मोठी बातमी : मूक आंदोलनातील लोकप्रतिनिधींच्या भाषणबाजीवर मराठा क्रांती मोर्चा नाराज !
- ‘संभाजीराजेंनी आजचे आंदोलन मुख्यमंत्र्यांकडून चर्चेची वेळ मिळावी म्हणून केले होते का?’
- याहीवर्षी राज्यभरात भरणार मोबाईलमध्येच शाळा

