मुंबई : मुंबई पोलिसांनी सबीबीआयचे संचालक सुबोध जयस्वाल यांना अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यासंदर्भात फोन टॅपिंग प्रकरणी समन्स बजावले आहे. १४ ऑक्टोबर रोजी सायबर सेलच्या मुंबई कार्यालयात हजर रहाण्याचे निर्देश मुंबई पोलिसांनी दिले आहेत. जयस्वाल यांनी पदाच्या कार्यकाळात फोन टॅप करुन अनेक महत्वाच्या अधिकाऱ्यांचे कागदपत्रे लीक केल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे.
१९८५ च्या बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी जयस्वाल यांची केंद्रीय अन्वेशन ब्युरोच्या प्रमुख पदी मे २०२१ रोजी पुढील दोन वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांचे सायबर सेल या प्रकरणाचा गोपनीय कायद्यातंर्गत तपास करत आहेत. तपासात सीबीआय संचालक जयस्वाल यांचा हस्तक्षेप आढळून आल्याने ही चौकशी केली जाणार आहे.
२०२० वर्षी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या गुप्तचर विभागाच्या आयुक्त होत्या. त्यांनी २५ ऑगस्ट २०२० रोजी तत्कालीन डीजीपी सुबोध जयस्वाल यांना एक गुप्त अहवाल पाठवला होता. त्यात अनेक आयपीएस अधिकारी आणि मंत्र्यांचे फोन टॅप करुन त्यांचे संभाषणाचा तपशील होता. जयस्वाल यांनी हा अहवाल तत्कालीन एसीएस होम सीताराम कुंटे यांना पाठवत चौकशीची मागणी केली होती.
या अहवालानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर बदली रॅकेट गैरव्यवहाराचा आरोप केला होता. याप्रकरणी रश्मी शुक्ला यांची चौकशी सुरु आहे. रश्मी शुक्ला यांनी २०१९ या वर्षी फोन टॅप केले होते असा आरोप आहे. याप्रकरणी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी दिलेल्या आदेशानुसार एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यातील एक नाव अज्ञात असे नोंदविले होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘एनसीबीच्या कारवाईवर शंका घेणेही चुकीचे!’ मलिकांच्या आरोपावर फडणवीसांची प्रतिक्रिया
- ‘प्रियंका गांधींच्या रुपाने इंदिराजींचे अस्तित्त्व पुन्हा दिसले!’ संजय राऊतांकडून ‘रोखठोक’ कौतूक
- ‘माफिया राज’ला सत्तेतील लोकांचा पाठिंबा; पंकजा मुंडेंचे मंत्री धनंजय मुंडेंवर टीकास्त्र
- मुलगा जेरबंद होताच केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्यावर राजीनाम्याचा दबाव
- लखीमपूर हिंसाचार प्रकरणी मंत्री पूत्र आशिष मिश्राला बेड्या


