मुंबई : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. सर्वसामान्य लोकांपासून ते अनेक नेते,कलाकार,खेळाडू या विषाणूच्या विळख्यात अडकल्याचे दिसून येत आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेले अजित पवार यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.सुरुवातीला अजित पवार यांना सर्दी, कणकण अशी काही लक्षणं दिसून आल्यानंतर ते घरीच विलग राहिले होते.
पहिल्यांदा त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा एकदा चाचणी केल्यानंतर त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. 26 ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्र्यांनी स्वत: ट्विट करुन त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने ते रुग्णालयात दाखल होत असल्याची माहिती दिली होती. सात दिवसांच्या उपचारानंतर काल उपमुख्यमंत्र्यांना घरी सोडण्यात आले आहे.
राज्यातील कोट्यवधी जनतेच्या सदिच्छा, कार्यकर्त्यांची प्रार्थना तसंच उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, सपोर्ट स्टाफच्या प्रयत्नांमुळे मी कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून आज घरी परतलो आहे. माझी प्रकृती उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील आणखी काही दिवस घरीच विलगीकरणात राहणार आहे. माझ्या उत्तम प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त करणाऱ्या हितचिंतकांचा मी मनापासून आभारी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेचे तसेच त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.
पुढील काही दिवस ते विलगीकरणात राहणार असून कार्यालयीन कामकाज घरुनच करणार आहेत. महत्वाच्या बैठकांना देखिल उपमुख्यमंत्री व्हीसीद्वारे उपस्थित असतील, अशी माहिती त्यांच्या कार्यालयाद्वारे देण्यात आली आहे अशी माहिती त्यांच्या कार्यालयाद्वारे देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- कपिल देव यांच्या निधनाच्या अफवांवर माजी क्रिकेटपटू मदन लाल भडकले
- वाढीव वीजबिलांबाबत दिवाळीपर्यंत निर्णय होण्याची शक्यता– नितीन राऊत
- चंद्रकांतदादा तुम्हाला हिमालयात जाण्याची गरज नाही, मुश्रीफांचा पाटलांना टोला
- 5 हजार लोकसंख्येच्या प्रत्येक गावात ओपन जीमचे प्रस्ताव सादर करण्याचे बनसोडेंचे आवाहन
- राज्यपाल व मंत्रींमंडळ यांच्यातील वाद आणि घटनात्मक पेच…


