Share

वडिलांच्या निधनानंतर मुंबई इंडियन्सने ट्विट करून केले पियुषचे सांत्वन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. यादरम्यान भारतात सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्याने स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करण्यात आली.

आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा खेळाडू चेतन सकारियाच्या वडिलांचे रविवारी ९ मे रोजी कोरोना संसर्गामुळे दुर्दैवी निधन झाले. हे वृत्त ताजे असतानाच मुंबई इंडियन्सचा खेळाडू पियुष चावलाच्या वडिलांचे आज म्हणजे सोमवारी १० मे रोजी निधन झाले आहे. पियुष चावलाचे वडिल प्रमोद कुमार चावला यांना काही दिवसापुर्वी कोरोनाची लागण झाली होती. वडिलांच्या निधनाची बातमी स्वत: चावलाने सोशल मीडीयाच्या माध्यमातुन दिली आहे.

https://twitter.com/mipaltan/status/1391632511034281984?s=20

यानंतर मुंबई इंडियन्सने पियुषला सांत्वन दिले आहे. मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत म्हंटले आहे कि, ‘आम्ही सगळे जण तुझ्या सोबत आहोत. सध्या तुम्ही सगळेजण त्रासातून जात आहात या काळात तुम्ही स्वतःला मजबूत बनवा.’ असे ट्विट करत मुंबई इंडियन्सने पियुषचे सांत्वन केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!