🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : इंडियान प्रीमियर लीग (IPL) २०१९ मध्ये मुंबई इंडियन्ससाठी खेळलेला, जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज रासिख सलाम याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली आहे. वयासंदर्भात खोटी माहिती पुरवल्याच्या आरोपात दोषी आढळल्याने बीसीसीआयने रासिख सलामवर कारवाई केली. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने ९ जून रोजी रासिख वर ही बंदी घातली.
येत्या २१ जुलैपासून इग्लंडमध्ये अंडर-१९ क्रिकेट सामने सुरु होणार आहेत. अंडर-१९ सामन्यांमध्ये रासिखच्या जागी प्रभात मौर्या याला स्थान दिले आहे. बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रक काढून रासिखच्या जागी प्रभात मौर्याला संधी दिल्याची माहिती दिली.
“अखिल भारतीय कनिष्ठ निवड समितीने २१ जुलैपासून इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या अंडर-१९ सामन्यांसाठी रासिखऐवजी प्रभात मौर्याला खेळवले जाईव. वयासंदर्भात चुकीचे कागदपत्र पुरवल्याच्या आरोपात दोषी , आढळल्याने रासिखला दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.“ असे बीसीसीआयने आपल्या पत्रकात म्हटलं आहे.
२०१९ च्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून रासिख सलाम खेळला होता. वेगवान गोलंदाज म्हणून त्याने सगळ्यांचेच लक्ष वेधले होते. मुंबई इंडियन्सने रासिखला २० लाख रुपयात खरेदी केले होते. जम्मू-काश्मीरमधून आयपीएलमध्ये खेळण्याचा मान मिळवणारा रासिख तिसरा खेळाडू ठरला होता. याआधी परवेज रसूल आणि मंजूर दार हे आयपीएलमध्ये खेळले आहेत.

