Share

मुंबईत आज ३९३ नवे करोना रुग्ण; मुंबईतल्या करोनाग्रस्तांची संख्या ५९८२

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा –  देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून काळजी वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबईत दिवसभरात ३९३ नवे करोना रुग्ण आढळले. त्यामुळे मुंबईतल्या करोनाग्रस्तांची संख्या ५ हजार ९८२ इतकी झाली आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

तसेच मृतांच्या संख्येत आणखी २५ जणांची भर पडली आहे. गेल्या २४ तासात करोनाचे २० रुग्ण दगावले आहेत. तर २३ ते २५ एप्रिल दरम्यान ५ मृतांची नोंद आजच्या आकडेवारीत करण्यात आली आहे.

मुंबईतल्या धारावीत आज ४२ नवे रुग्ण सापडले. तर चार करोना बाधितांचा मृत्यू झाला. धारावीतील करोनाबाधितांची संख्या आता ३३० झाली आहे तर आत्तापर्यंत मुंबईतल्या धारावीत १८ जणांचा मृत्यू झाला आहे.

आज मृत झालेल्या रुग्णांमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. दोन रुग्ण ६० वर्षे वयाचे एक रुग्ण ५५ वर्षांचा तर एक रुग्ण ४८ वर्षांचा आहे. केईएम रुग्णालयात दोघांचा तर लोकमान्य टिळक रुग्णालयात दोघांचा मृत्यू झाला.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!